कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करणे टाळावे !

प.पू. आबा उपाध्ये आणि कै. प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये

‘आपला शेजारी हा आपला खरा मित्र आणि खरा शत्रूही असतो. यांपैकी आपण नेमके कशाला प्राधान्य द्यायचे ? मित्रत्वाला कि शत्रुत्वाला ? आपल्यावर काही प्रसंग ओढावल्यास मित्र धावून येतो. विशेषतः पुरुषांपेक्षा महिलांचे जाणे-येणे अधिक असते; कारण पुरुष नोकरीमध्ये व्यस्त असतात. ‘शेजार्‍याशी मित्रत्वाचे नाते असावे’, हे कितीही खरे असले, तरी कुठल्याही प्रसंगी मैत्रीचा अतिरेक नसावा. त्यामुळे भांडणाचा प्रसंग उद्भवणार नाही. प्रत्येकाशी मैत्री असावी, प्रेम असावे; पण त्याचा विपर्यास केला जाऊ नये, इतकेच ! आपल्याकडे म्हण आहे, ‘अति सर्वत्र वर्ज्ययेत् ।, म्हणजे ‘सर्व गोष्टी अती करणे टाळावे.’

– सद्गुरुस्फूर्ती प.पू. आबा उपाध्ये आणि पू. (सौ.) मंगला उपाध्ये, पुणे (डिसेंबर २०१७)


Multi Language |Offline reading | PDF