धर्मांधांच्या अत्याचारांमुळे विस्थापित झालेल्या बर्मामाइंस (जमशेदपूर) येथील हिंदु परिवारांचे तात्काळ पुनर्वसन करण्याची हिंदूंची मागणी !

राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या वतीने शासनाला द्यावयाची निवेदने

देशात विविध ठिकाणी होत आहेत राष्ट्रीय हिंदू आंदोलने !

१०० कोटी हिंदूंच्या देशात अशी मागणी करावी लागणे, ही हिंदू तसेच सरकार यांच्यासाठी लांच्छनास्पदच गोष्ट होय ! यावर हिंदुहिताचा विचार करणार्‍या हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हाच एकमेव पर्याय असल्याचे जाणा !

राष्ट्र आणि धर्म यांच्यावर होणार्‍या आघातांच्या विरोधात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि सामान्य हिंदु नागरिक ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलनां’च्या माध्यमातून, तसेच निवेदने सादर करून आपला आवाज शासनदरबारी यशस्वीरित्या पोचवत आहेत. ‘झारखंड राज्यातील बर्मामाइंस (जमशेदपूर) येथील शेकडो हिंदू हे धर्मांधांच्या अत्याचारांना कंटाळले आहेत. स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी त्यांनी तेथून पलायन केले आहे. या हिंदु परिवारांचे तात्काळ पुनर्वसन करून त्यांना पोलीस संरक्षण देण्यासंदर्भातील मागण्यांचे निवेदन येथे देत आहोत. ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलनां’च्या माध्यमातून या न्याय्य मागण्या व्यापक स्तरावर पोेचवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

                                                                                                                                                                                                                 दिनांक :        .२.२०१९

प्रति,

माननीय पंतप्रधान, भारत सरकार, नवी देहली ११००११.

विषय : धर्मांधांच्या अत्याचारांमुळे विस्थापित झालेल्या बर्मामाइंस (जमशेदपूर) येथील हिंदु परिवारांचे तात्काळ पुनर्वसन करून त्यांना पोलीस संरक्षण देण्याविषयी…

महोदय,

झारखंडच्या जमशेदपूर येथील बर्मामाइंस येथून ४३ हिंदु परिवारांमधील जवळपास ४०० हिंदूंनी धर्मांधांच्या खुल्या धमक्यांमुळे पलायन केले आहे. या हिंदूंना धर्मांधांकडून ‘येथून पोलिसांना हटवा, मग कळेल तुम्हाला आम्ही कोण आहोत ?’, अशा प्रकारच्या धमक्या देण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी बर्मामाइंसमध्ये हिंदू-मुसलमान दंगल झाली होती. या वेळी धर्मांधांनी हिंदूंच्या घरात घुसून साहित्य लुटून नेले होते. त्यामुळे येथील हिंदू भयभीत झाले आहेत. ज्या पद्धतीने काश्मीरमध्ये पाकप्रेमी धर्मांध मुसलमानांनी हिंदूंना हुसकावून लावले आणि आसाममध्ये बांगलादेशी घुसखोरांनी हिंदूंना हुसकावून लावले; इतकेच काय उत्तरप्रदेश येथील कैराना या ठिकाणीही असाच प्रकार झाल्याचे दिसून आले. तोच प्रकार सध्या जमशेदपूरमध्येही चालू झाला आहे. या परिस्थितीकडे तात्काळ लक्ष देऊन केंद्रशासनाने योग्य ती कृती करावी अन्यथा काश्मीरमधून हिंदू जसे कायमचे विस्थापित झाले, तसेच जमशेदपूर येथील हिंदूंना कायमस्वरूपी विस्थापित व्हावे लागेल. भारतातील हिंदूंना भारतातच विस्थापित व्हावे लागत आहे, ही हिंदूबहुल भारताची शोकांतिकाच म्हणावी लागेल.

 तरी या संदर्भात आम्ही काही सूत्रे आपल्या निदर्शनास आणून देत आहोत.

१. बर्मामाइंस येथील आमदार पवन अग्रवाल आणि पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक हिंदूंना ‘आम्ही तुम्हाला सुरक्षा देऊ, तुम्ही घर सोडून जाऊ नका’, असे सांगितले. याचसमवेत या ठिकाणी मोठ्या संख्येने पोलीस सुरक्षा वाढवली आहे. तरीही हिंदूंना त्यावर विश्‍वास नसून हिंदूंनी घरांना कुलूप लावून पलायन केले आहे.

२. असे असूनही हिंदूंनी सांगितले आहे की, जोपर्यंत धमक्या देणार्‍या आरोपींना अटक केली जात नाही, तोपर्यंत आम्ही परत येणार नाही.

३. जनतेच्या रक्षणाचे दायित्व असलेल्या पोलिसांनी अत्याचारग्रस्त नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन गुन्हेगारांना त्वरित अटक करणे अपेक्षित होते; मात्र तसे झालेले नाही.

४. वर्ष १९९० मध्ये काश्मीर खोर्‍यातील हिंदूंवर जिहादी आतंकवाद्यांकडून आक्रमणे करण्यात आली. यात ९० सहस्र हिंदूंची हत्या करण्यात आली, तर सहस्रो महिलांवर बलात्कार करण्यात आले. हिंदूंची घरे आणि संपत्ती बळकावून साडेचार लाखांहून अधिक हिंदूंना काश्मीरमधून हाकलण्यात आले. या विस्थापित हिंदूंचे अद्यापही पुनर्वसन झाले नसून २८ वर्षे होऊनही काश्मिरी हिंदू न्यायापासून वंचित आहेत.

६. आसाममधील मुसलमानबहुल जिल्ह्यांत वरचेवर दंगली होऊन हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. वर्ष २०१२ मध्ये ११ जिल्ह्यांत उसळलेल्या महाभयानक दंगलीत ५०० गावे जळून खाक झाली होती, तर २ लाखहून अधिक बोडो हिंदूंना निर्वासित व्हावे लागले होते. या हिंदूंना अद्याप कोणताच न्याय मिळालेला नाही.

७. बंगाल राज्यातही सातत्याने मुसलमानबहुल परिसरात हिंदूंवर आक्रमणे होण्याचे प्रकार वाढले आहेत. तेथेही मुसलमानबहुल गावांतून हिंदूंना गाव सोडून जावे लागत आहे.

८. धर्मांधांकडून हिंदूंवर होणार्‍या वाढत्या अत्याचारांच्या घटना पहाता हिंदुबहुल देशात हिंदूच अल्पसंख्य होतील, असा एक दिवस येईल कि काय, अशी स्थिती आहे.

 तरी या संदर्भात आमच्या मागण्या आहेत की …

१. बर्मामाइंस (जमशेदपूर) येथे दंगल घडवणार्‍या आणि धमकी देणार्‍या धर्मांधांवर, तसेच तेथील कायदा-सुव्यवस्था बिघडण्याला उत्तरदायी सर्व यंत्रणांवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

२. या हिंसाचारामागे नेमका कोणाचा हात आहे, याचा शोध घेण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती नेमावी.

३. या प्रकरणी केंद्र सरकारने त्वरित हस्तक्षेप करून हिंदूंचे रक्षण करावे आणि हिंदूंना न्याय द्यावा.

४. बर्मामाइंस येथे रहात असलेल्या अल्पसंख्य हिंदूंना तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावे आणि धर्मांधांच्या भीतीने घर सोडून गेलेल्या हिंदूंचे पुनर्वसन करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवावा.

                                                                             आपला विश्‍वासू,

                                                                              संघटना / व्यक्ती यांचे नाव

                                                                          (संपर्क :               )

हिंदु धर्माभिमान्यांना आवाहन !

या निवेदनांच्या प्रती हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि धर्माभिमानी हिंदू आपल्या शहरातील लोकप्रतिनिधी अथवा प्रशासकीय अधिकारी यांना देऊ शकतात. ही निवेदने हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळावर पुढील मार्गिकेवर उपलब्ध आहेत – https://www.hindujagruti.org/hindi/hjs-activities/rashtriya-hindu-andolan या मार्गिकेवर सदर निवेदने मराठी आणि हिंदी या भाषेत उपलब्ध आहेत. सदर निवेदने शासनदरबारी दिल्यावर त्याची माहिती दैनिक सनातन प्रभातच्या जवळच्या कार्यालयाला पाठवल्यास त्यास प्रसिद्धीही दिली जाईल.


Multi Language |Offline reading | PDF