एम्आर्आय, सीटीस्कॅनसह ८ उपकरणांना औषधांचा दर्जा देणार !

मुंबई – सर्व प्रकारची प्रत्यारोपण उपकरणे, सिटी स्कॅन, एम्आर्आय, डिफ्रिबेलटर्स, डायलिसिस, पेट उपकरणे, क्ष-किरण आणि बोनमॅरो पेशी विलगीकरण अशा ८ उपकरणांना औषधांचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्रीय आरोग्य विभागाने घेतला आहे. या संदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये ही उपकरणे ‘औषधे आणि सौंदर्यप्रसाधने’ कायद्यामध्ये १ एप्रिल २०२० पासून समाविष्ट करण्यात येतील, असे नमूद करण्यात आले आहे. ‘औषधे आणि सौंदर्यप्रसाधने’ कायद्यांतर्गत सध्या २३ वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त वैद्यकीय क्षेत्रात वापरात असलेल्या अन्य वैद्यकीय उपकरणांचा समावेश नाही. त्यामुळे या उपकरणांच्या वापरावर कायद्याचा वचक नाही. वैद्यकीय क्षेत्रात दैनंदिन वापरात दर्जेदार वैद्यकीय उपकरणांचा वापर केला जावा, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

अन्न आणि औषध प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले की, उपकरणे दर्जेदार नसल्यास त्याच्या चाचण्यांचे अहवालही चुकीचे येतात. या अधिसूचनेची कार्यवाही चालू झाल्यावर या उपकरणांची मानके आणि दर्जा पाळण्यावर बंधने येतील. परिणामी चाचण्यांचे अहवाल अचूक येण्यास साहाय्य होईल.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now