महंमद अफझल आणि मकबूल भट यांचे अवशेष त्यांच्या कुटुंबियांना द्यावेत ! –  पीडीपीच्या खासदाराची मागणी

आतंकवाद्यांच्या बाजूने बोलणारे देशात खासदार होतात, यातून लोकशाहीची निरर्थकता लक्षात येते !

श्रीनगर – काश्मीरमधील पीडीपीचे खासदार महंमद फैयाज मीर यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून, संसदेवरील आक्रमणातील सूत्रधार असणार्‍या आणि फाशी देण्यात आलेला आतंकवादी महंमद अफझल, तसेच वर्ष १९८४ मध्ये फाशी देण्यात आलेला जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा संस्थापक सदस्य मकबूल भट यांचे अवशेष त्यांच्या कुटुंबियांना देण्यात यावेत, अशी मागणी केली आहे.

मीर म्हणाले की, अशी मागणी करणे अयोग्य नाही. कारण पूर्वी माजी पंतप्रधानांच्या दोषींची फाशीची शिक्षा रहित करून ती जन्मठेप करण्यात आली होती.


Multi Language |Offline reading | PDF