ओढ लागली तुझी या जिवाला । जिवाला चैतन्याची ओढ लावणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

श्रीमती उषा बडगुजर

‘मी रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात येतांना प्रवासात माझ्या जिवाला गुरुभेटीची ओढ लागली. त्या वेळी मला सुचलेली कविता पुढे देत आहे.

ओढ लागली तुझी या जिवाला ।
तुझे पांग कसे फेडू कळत नाही मजला ॥
षड्र्ररिपूंचे ओझे पेलवत नाही मला ।
तूच शक्ती दे अन् ओझे अल्प करवून घे देवा ॥ १ ॥

भक्तीभावाची जिवाला आस लागली ।
तुझे चरण ठेविले या हृदयमंदिरी ॥
शरणागत भाव अर्पिते तव चरणी ।
कर्तेपणा अर्पिते क्षणोक्षणी श्रीचरणी ॥ २ ॥

क्षमायाचना अर्पिते तव चरणी ।
हा अज्ञानी जीव आतुरला चैतन्य ग्रहण करण्यासाठी ॥
तूच कर्ता-करविता घेशील या जिवास श्रीचरणी ।
अनंत कोटी कृतज्ञता अर्पिते तव पावन चरणी ॥ ३ ॥’

– श्रीमती उषा बडगुजर, जळगाव (११.११.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF