‘मृत्युंजयमंत्रा’चे पठण करतांना साधिकेला शिवाच्या तिसर्‍या डोळ्याचे दर्शन होऊन आकाशात शिवपिंडीचे अनेक आकार आणि ‘ॐ’ दिसणे

‘२४.६.२०१८ या दिवशी आम्ही रामनाथी आश्रमातील आगाशीत सकाळी ११ वाजता ‘मृत्युंजयमंत्रा’चे पठण करत होतो. पठण करत असतांना मला उत्तर दिशेला शिवाच्या तिसर्‍या डोळ्याचे दर्शन झाले. शिवाचा तिसरा डोळा उघडलेला होता आणि क्रोधित दिसत होता. त्या वेळी मला आकाशात शिवपिंडीसारखेे अनेक आकार दिसत होते, तसेच ‘सर्व ग्रह हात जोडून उभे आहेत’, असे दिसले. मला ढगात अनेक ‘ॐ’ उमटलेलेही दिसले.’

– सौ. शालन शेट्ये, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.७.२०१८)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक


Multi Language |Offline reading | PDF