राममंदिर उभारले जात नाही, हे हिंदूंचे दुर्दैव ! – महंत भागीरथी महाराज

कुंभमेळा प्रयागराज २०१९

महंत भागीरथी महाराज

प्रयागराज (कुंभनगरी) – अधिवेशनात केवळ भाषण करण्याची वेळ नाही. केवळ ‘भारतमाता की जय’ म्हणण्यापेक्षा प्रत्यक्ष कार्य करण्याची वेळ आली आहे. आज देव, देश आणि धर्म संकटात आहे. राममंदिर उभारले जात नाही, हे हिंदूंचे दुर्दैव आहे. यासाठी सर्व हिंदूंना जागृत करून संघटित करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन प्रयागराज (कुंभनगरी) येथे ८ फेब्रुवारी या दिवशी ‘भूमा निकेतन पंडाल’ येथे हिंदु राष्ट्र स्थापनेच्या हेतूने आयोजित केलेल्या ‘हिंदू अधिवेशना’त महंत भागीरथी महाराज यांनी केले.


Multi Language |Offline reading | PDF