‘मीडिया ट्रायल’चा न्यायाधिशांच्या निर्णयावर प्रभाव पडतो ! –  न्या. ए.के. सिक्री

अशा प्रकारे ‘मीडिया ट्रायल’ चालवून न्यायाधिशांचे निर्णय प्रभावित करणार्‍या प्रसारमाध्यमांवर आता न्यायालयानेच कारवाई करावी, अशी राष्ट्रप्रेमींची इच्छा आहे !

नवी देहली – ‘मीडिया ट्रायल’ (एखाद्या प्रकरणात न्यायालयाने निकाल देण्याआधीच प्रसारमाध्यमांनी स्वतः न्यायाधिशांच्या भूमिकेत जाऊन त्याविषयी स्वतःची मते व्यक्त करणे) यापूर्वीही होत होते; मात्र आज जे होत आहे त्यामध्ये एखादे सूत्र जाणीवपूर्वक तापवले जाते. त्या संदर्भात याचिका प्रविष्ट केली जाते. या याचिकेवर सुनावणी चालू होण्यापूर्वीच ‘याचा निर्णय काय असावा?’ यावर लोक चर्चा चालू करतात. यामध्ये ‘निकाल काय आला आहे?’, यावर चर्चा न होता ‘निकाल काय असायला हवा ?’, यावर चर्चा केली जाते. त्यामुळे माझ्या अनुभवानुसार न्यायाधीश कसा निर्णय देतात, यावर याचा प्रभाव पडतो, असे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश ए.के. सिक्री यांनी येथे एका संमेलनात म्हटले.

१. न्यायाधीश सिक्री पुढे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात (न्यायाधीश प्रभावित होण्याचे) प्रमाण अधिक नाही; कारण सर्वोच्च न्यायालयात नियुक्त होईपर्यंत ते अधिक परिपक्व होतात. त्यांना हे कळते की, प्रसारमाध्यमांमध्ये काहीही झाले, तरी कायद्याच्या आधारे प्रकरणावर निर्णय कसा द्यायचा. काही वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय किंवा कनिष्ठ न्यायालय यांनी एकदा निर्णय दिला, तर ‘आपल्याला या निर्णयावर टीका करण्याचा पूर्ण अधिकार आहे’, असे समजले जात होते; मात्र आता जे न्यायाधीश निर्णय देतात त्यांनाही अपकीर्त केले जाते. त्यांच्या विरोधात भाषणबाजी केली जाते.

२. या वेळी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल माधवी गोराडिया-दिवाण म्हणाल्या की, ‘बातमी आणि खोटी बातमी’, ‘बातमी आणि विचार’, तसेच ‘नागरिक आणि पत्रकार’ यांच्यामधील भेद पुसट झाला आहे. आता अधिवक्तेही कार्यकर्ते झाले आहेत. हे आपल्यासमोरील एक आव्हान आहे.


Multi Language |Offline reading | PDF