भिवंडीत झालेल्या दंगलीतील धर्मांधाला १२ वर्षांनी अटक !

५ दिवसांची पोलीस कोठडी

तथाकथित विचारवंतांच्या हत्यांच्या संदर्भात पोलीस पुरोगाम्यांच्या दबावामुळे खोट्या आरोपींनाही अटक करतात; मात्र भिवंडी दंगलीत पोलीसच मारले जाऊनही या दंगलीतील आरोपीला अटक करण्यासाठी १२ वर्षे लागतात यापेक्षा दुर्दैव ते काय ? या घटनेविषयी एकाही पुरोगाम्याने कधी ‘ब्र’ तरी काढला आहे का ? ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

भिवंडी – येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जागेवर बांधण्यात येणार्‍या पोलीस ठाण्याच्या बांधकामास विरोध करून धर्मांधांनी ५ जुलै २००६ या दिवशी शहरात दंगल घडवली, असा आरोप रझा अकादमी या संघटनेवर आहे. या दंगलीच्या वेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात घायाळ झालेला धर्मांध दंगेखोर मोईनुद्दीन गुलाम हुसेन मोमीन (वय ३५ वर्षे) याला १२ वर्षांनंतर ७ फेब्रुवारीला निजामपूर पोलिसांनी गुन्हा नोंद करून अटक केली आहे. मोईनुद्दीन यास न्यायालयात उपस्थित केले असता त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.


Multi Language |Offline reading | PDF