५५ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली यवतमाळ येथील कु. अनुष्का जयंत करोडदेव (वय १३ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. अनुष्का जयंत करोडदेव एक आहे !

कु. अनुष्का करोडदेव

(‘वर्ष २०१६ मध्ये कु. अनुष्का हिची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के होती.’ – संकलक)

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले     

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले        

यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

माघ शुक्ल पक्ष सप्तमी म्हणजेच रथसप्तमी (१२.२.२०१९) या दिवशी कु. अनुष्का जयंत करोडदेव हिचा तिथीनुसार वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

कु. अनुष्का करोडदेव हिला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून अनेक शुभाशीर्वाद !

१. ‘कु. अनुष्का सतत आनंदी असते.

२. ती लहान-मोठ्या सर्वांशी मनमोकळेपणाने बोलते.

३. उत्तम स्मरणशक्ती

अ. तिचे गणपति अथर्वशीर्ष पूर्ण पाठ आहे. शाळेत ‘सर्वार्ंत चांगले अथर्वशीर्ष म्हणते’; म्हणून तिला प्रमुख बनवले आहे.

आ. अनुष्काला कबिराचे दोहे संपूर्ण पाठ आहेत. एखादा प्रसंग झाला की, लगेच तिला त्या प्रसंगानुरूप कबिराच्या दोह्यांतील ओळी आठवतात.

४. प्रेमभाव

ती झाडे-फुले यांच्याशी लाडाने बोलतेच; पण बालदी, मग इत्यादी निर्जीव वस्तूंशीही पुष्कळ प्रेमाने बोलते.

५. इतरांना साहाय्य करणे

ती मला घरकामात साहाय्य करते. तिला स्वयंपाक करायला आवडतो. मला कधी बरे वाटत नसल्यास तीच पूर्ण स्वयंपाक करते.

६. सात्त्विकतेची आवड

अनुष्काला साडी नेसायला आवडते. ती सुट्टीच्या दिवशी साडी नेसते.

७. ती बिंदी लावून सजते आणि नृत्य करते. तिला नृत्य करायला आवडते.

८. क्षात्रभाव

अ. अनुष्कामध्ये क्षात्रभाव आहे. एखादा प्रसंग घडला तर, ती म्हणते, ‘‘घाबरायचे नाही, लढायचे.’’

आ. गुरुपौर्णिमेच्या वेळी तिने पुष्कळ क्षात्रभावाने स्वरक्षण प्रशिक्षण सादर केले.

९. आम्ही घरी स्वभावदोषांविषयी चर्चा करतो, तेव्हा अनुष्का म्हणते,‘‘चूक करतो तो माणूस आणि चुका सांगणारा तो देवमाणूस !’’

१०. भाव

अ. ती छोटे-छोटे भावप्रयोग छान करते.

आ. गुरुपौर्णिमेला स्वरक्षण प्रशिक्षण सादर करतांना ती परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ‘गुरुदेव, तुम्हीच माझ्याकडून हे करवून घ्या’, अशी प्रार्थना करत होती आणि सतत ‘कृष्ण, कृष्ण’, असा भगवान श्रीकृष्णाचा नामजप करत होती.

इ. तिने गुरुपौर्णिमेच्या वेळी आरती म्हणण्याची सेवा पुष्कळ भावपूर्ण केली.

११. अनुभूती

‘अनुष्काशी बोलल्यावर आवरण निघून जाते’, असे बर्‍याच साधकांनी सांगितले आहे.

१२. स्वभावदोष

आळस, मोठ्याने बोलणे आणि स्वतःचा मोठेपणा दाखवणे’

– सौ. सोनल जयंत करोडदेव (आई), यवतमाळ (१.१०.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF