कुरुंदवाड येथील सनातनचे साधक डॉ. उमेश लंबे यांच्या रुग्णालयात धर्मांधांकडून तोडफोड !

कुरुंदवाड मेडिकल असोसिएशनची संबंधितांना अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची निवेदनाद्वारे मागणी

पोलीस निरीक्षक निरवडे (उजवीकडे) यांच्याशी चर्चा करतांना कुरुंदवाड मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी

कुरुंदवाड (जिल्हा कोल्हापूर), ११ फेब्रुवारी (वार्ता.) – १० फेब्रुवारीला दुपारी २.३० वाजता सनातनचे साधक डॉ. उमेश लंबे हे त्यांच्या ‘यश रुग्णालय’, नवबाग रस्ता येथे एका रुग्णास तपासत असतांना अचानक अज्ञात धर्मांधांनी रुग्णालयावर आक्रमण केले. या वेळी धर्मांधांनी रुग्णालयाच्या ‘वेटींग रूम’ची तोडफोड केली. यात दुभाजकाला (पार्टीशनला) लावलेल्या काचा फोडण्यात आल्या, तसेच रुग्णांना बसण्यासाठी ठेवण्यात आलेला बाक बाहेर फेकून देण्यात आला. या संदर्भात डॉ. उमेश लंबे यांनी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात अज्ञातांनी तोडफोड करून १० सहस्र रुपयांची हानी केल्याची तक्रार दिली आहे. या प्रकरणी अज्ञातांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

‘कुरुंदवाड मेडिकल असोसिएशन’ची संबंधितांना अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची निवेदनाद्वारे मागणी

अनोळखी व्यक्तींनी रुग्णालयाची तोडफोड करून दहशत माजवल्यामुळे आधुनिक वैद्य अन् रुग्ण या पवित्र नात्याला धक्का लागतो, तसेच अशी कृती ज्या असामाजिक व्यक्तींकडून झाली आहे, त्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करावी आणि त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ‘कुरुंदवाड मेडिकल असोसिएशन’ने ११ फेब्रुवारी या दिवशी कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. निरवडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या वेळी मोठ्या संख्येने कुरुंदवाड मेडिकल असोसिएशनचे प्रतिनिधी डॉ. उमेश लंबे यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते.


Multi Language |Offline reading | PDF