लक्ष्मणपुरी येथे प्रियांका वाड्रा यांना दुर्गादेवीच्या रूपात दाखवणारा काँग्रेसचा फलक

  • निवडणुका जवळ आल्या की, भाजपवाल्यांना ‘राममंदिर’ आठवते, तसे आता काँग्रेसवाल्यांनाही देवता आठवू लागल्या आहेत, हे लक्षात घ्या !
  • प्रियांका वाड्रा ख्रिस्ती असतांना त्यांना त्यांच्या धर्माच्या श्रद्धास्थानांपैकी म्हणजे‘मदर मेरी’च्या वगैरे रूपात दाखवण्याचे धाडस काँग्रेसवाल्यांनी का केले नाही ?
  • हिंदूंना ‘आतंकवादी’ ठरवणार्‍या काँग्रेसकडून आता होणार्‍या देवतांच्या अवमानाच्या विरोधात संबंधितांवर कारवाई होण्यासाठी हिंदूंनी कृतीशील प्रयत्न करायला हवेत !

(हे छायाचित्रे प्रसिद्ध करण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने ही प्रसिद्ध केली आहेत. – संपादक)

लक्ष्मणपुरी – काँग्रेसच्या सरचिटणीसपदाचे दायित्व स्वीकारल्यानंतर प्रियांका वाड्रा ११ फेब्रुवारीला प्रथमच उत्तरप्रदेशाच्या दौर्‍यावर आल्या होत्या. लक्ष्मणपुरी शहरातील काँग्रेसच्या कार्यालयात पोहोचण्यापूर्वी त्या ‘रोड शो’मध्ये (मिरवणुकीत) सहभागी झाल्या होत्या. या वेळी काँग्रेसवाल्यांनी ठिकठिकाणी स्वागतासाठी फलक लावले होते. एका ठिकाणच्या फलकावर प्रियांका वाड्रा यांना दुर्गादेवीच्या रूपात दाखवण्यात आले होते.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now