बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या आमदाराची गोळ्या झाडून हत्या

बंगालमध्ये भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या आहेत. तरीही राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यात आली नाही. आता त्याचाच परिणाम सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या आमदाराच्या हत्येत झाला, असेच म्हणावे लागेल !

कोलकाता – ९ फेब्रुवारीच्या रात्री बंगालच्या नादिया जिल्ह्यात फुलबाडी येथे श्री सरस्वतीदेवीच्या पूजेच्या कार्यक्रमात सहभागी झालेले तृणमूल काँग्रेसचे आमदार सत्यजीत बिश्‍वास यांची काही आक्रमणकर्त्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. ‘सत्यजीत बिस्वास यांची हत्या भाजपच्या सांगण्यावरून झाली, तसेच तृणमूल काँग्रेसमधील काही विश्‍वासघातकी लोकांनी या कामासाठी भाजपला साहाय्य केले’, असा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. (असे आहे, तर बंगालमध्ये हिंदुत्वनिष्ठांच्या ज्या हत्या झाल्या, त्या तृणमूल काँग्रेसच्या सांगण्यावरून झाल्या’, असे म्हणायचे का ? – संपादक)  तृणमूलच्या आरोपानंतर येथील भाजपचे नेते मुकूल रॉय यांच्या विरोधातही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी २ आरोपींना पकडले आहे.


Multi Language |Offline reading | PDF