सरस्वतीपूजनाच्या निमित्ताने मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या शुभेच्छा !

१५ वर्षे राज्याचे मुख्यमंत्री असतांना शिवराजसिंह चौहान यांनी राज्यातील धार येथील भोजशाळेत श्री सरस्वतीदेवीचे मंदिर हिंदूंच्या कह्यात देऊन तेथे प्रतिदिन पूजा करण्याची अनुमती का दिली नाही?, हे प्रथम त्यांनी सांगायला हवे !

भोपाळ – मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते शिवराजसिंह चौहान यांनी १० फेब्रुवारीला सरस्वतीपूजनासाठी हिंदूंना ट्विटरद्वारे शुभेच्छा दिल्या. ‘माता सरस्वतीच्या कृपेने सर्वांमध्ये प्रेम, सौहार्द आणि आपलेपणा निर्माण व्हावा. आपल्या सर्वांची सद्बुद्धी, वाणी आणि विवेक समृद्ध व्हावे’, अशा शब्दांत त्यांनी शुभेच्छा दिल्या.


Multi Language |Offline reading | PDF