जिहादी आतंकवाद्यांच्या पैशांतून बांधलेल्या मशिदी आणि मदरसे यांना टाळे ठोकणार

अंमलबजावणी संचालनालयाचे अन्वेषण चालू !

  • ‘आतंकवाद्यांना धर्म नसतो’, म्हणणारे यावर काहीच बोलणार नाहीत, हे लक्षात घ्या !
  • देशातील प्रत्येक मशिदीची आणि मदरशांची चौकशी करून अशा प्रकारच्या कारवाया चालणार्‍या प्रत्येक वास्तूंना टाळे ठोकले पाहिजे !
  • मदरशांना आतंकवाद्यांचा पैसा मिळतो आणि भाजप सरकारही त्यांच्या आधुनिकीकरणासाठी कोट्यवधी रुपयांचे अनुदान देते ! हा राष्ट्रघात होय !

 

नवी देहली – अंमलबजावणी संचालनालयाने लष्कर-ए-तोयबा या जिहादी आतंकवादी संघटनेने आर्थिक साहाय्य केलेल्या मशिदी आणि मदरसे यांना टाळे ठोकण्याच्या दिशेने अन्वेषण चालू केले आहे.

सप्टेंबर २०१८ मध्ये देहली येथे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने घातलेल्या धाडीतून ५६ कोटी, ४३ सहस्र रुपयांचे नेपाळी चलन आणि अन्य साहित्य जप्त केले होते. या प्रकरणी काही जणांना अटक करण्यात आली होती. देशभरातील अनेक मशिदी आणि मदरसे यांना आतंकवादी संघटनांकडून साहाय्य करण्यात आल्याची माहिती त्यांच्याकडून मिळाली होती. या मशिदींमधून आतंकवादी घडवण्याचे कार्य चालू असल्याचेही समोर आले होते. या प्रकरणात अटक झालेला महंमद सलमान हा हरियाणाच्या पलवल जिल्ह्यातील मशिदीचा इमाम आहे. त्याच्या चौकशीत त्याने लष्कर-ए-तोयबाकडून मिळणारा पैसा मशिदी आणि मदरसे उभारण्यासाठी वापरल्याचे स्वीकारले होते. लष्कर-ए-तोयबाचा आतंकवादी हाफिज सईद हा फलाह-ए-इन्सानियत नावाच्या एका बनावट संघटनेच्या माध्यमातून हा पैसा पुरवत होता.


Multi Language |Offline reading | PDF