ऋषियागाच्या वेळी श्री. अमोल हंबर्डे यांना आलेल्या अनुभूती आणि देवतांचे अस्तित्व जाणवून त्यांनी अनुभवलेली भावावस्था !

श्री. अमोल हंबर्डे

१. सद्गुरु (सौ.) बिंदाताई, पू. गाडगीळकाका आणि पुरोहित-साधक यागात आहुती अर्पण करतांना ‘ते सर्व साधकांच्या स्वभावदोषांचीच आहुती देत आहेत’, असे जाणवणे

‘देवाच्या कृपेने मला ९.१.२०१९ या दिवशी सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथे झालेल्या ऋषियागाच्या वेळी आध्यात्मिक उपायांना बसण्याची संधी मिळाली. गेल्या ८ – १५ दिवसांत आश्रमात बरेच यज्ञ झाले. प्रत्येक यज्ञाच्या वेळी सद्गुरु (सौ.) बिंदाताई, पू. गाडगीळकाका आणि साधक-पुरोहित यागात आहुती अर्पण करतांना ‘ते सर्व साधकांच्या स्वभावदोषांचीच आहुती देत आहेत’, असे मला जाणवले.

२. साधकांना होणारे त्रास न्यून करण्यासाठी याग चालू असून आहुतीच्या माध्यमातून साधकांचे स्वभावदोष न्यून होत असल्याचे जाणवणे

‘साधक स्वतःतील स्वभावदोष आणि अहं न्यून करण्यासाठी प्रयत्नरत असल्याने त्यांना वाईट शक्ती विरोध करत आहेत. त्यामुळे साधकांना होणारे त्रास न्यून करण्यासाठीच हा याग चालू असून यागात आहुतीच्या माध्यमातून सर्व साधकांचे स्वभावदोष न्यून होत आहेत’, असे मला जाणवले.

३. यागाच्या आहुतीचे मंत्र ऐकतांना चंदनाचा सुगंध येऊन भाव जागृत होणे

यागाच्या वेळी आध्यात्मिक उपायांना बसल्यावर ‘तेथे सर्व देवता उपस्थित आहेत’, असे मला जाणवले. मला अकस्मात चंदनाचा सुगंध येऊ लागला. नंतर यागाच्या आहुतीचे मंत्र ऐकून माझी भावजागृती होऊन डोळ्यांत भावाश्रू दाटून आले. यज्ञाची सांगता होईपर्यंत, म्हणजेच पूर्णाहुती आणि आरती संपेपर्यंत मी भावावस्था अनुभवली. तेव्हा ‘ही भावावस्था निरंतर रहावी’, अशी सर्व देवता, ऋषि आणि परात्पर गुरुदेव यांच्या चरणी मी प्रार्थना केली.

भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरुदेव यांच्या कृपेनेच मला या अनुभूती आल्या. यासाठी त्यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !’

– श्री. अमोल हंबर्डे, रामनाथी आश्रम, गोवा. (९.१.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF