कुलगाममध्ये ५ आतंकवादी ठार

सैनिकांवर देशद्रोही धर्मांधांकडून दगडफेक : ४ पोलीस घायाळ

गेल्या ३ दशकांत सैनिक आणि पोलीस यांनी सहस्रावधी आतंकवाद्यांना ठार केले, तरी तेथील आतंकवाद संपलेला नाही; कारण आतंकवाद्यांचा कारखाना असणारा पाक आतंकवाद्यांची निर्मिती करतच आहे. आतंकवाद संपवण्यासाठी मुळावर घाव घालून पाकला नष्ट करण्याची आवश्यकता आहे. ते धाडस काँग्रेसमध्ये नव्हते अन् आता भाजपमध्येही नाही. ही वस्तूस्थिती पहाता हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

कुलगाम (जम्मू-काश्मीर) – कुलगाम जिल्ह्यातील केलम परिसरात १० फेब्रुवारीच्या पहाटेपासून सुरक्षादल आणि आतंकवादी यांच्यात चकमक चालू होती. यात ५ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले. येथे काही आतंकवादी लपल्याच्या माहितीवरून शोधमोहीम राबवण्यात आल्यावर ही चकमक उडाली. आतंकवादी ठार झाल्यानंतर येथील स्थानिक देशद्रोही धर्मांधांकडून सैनिकांवर दगडफेक करण्यात आली. यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४ पोलीस घायाळ झाले.


Multi Language |Offline reading | PDF