सनातनच्या प्रदर्शनातील विषयांचे चिंतन करून संतांनी सनातन धर्माला सर्वांत वरच्या स्थानी आणण्याचे कार्य करायला हवे ! – श्री श्री १००८ महामंडलेश्‍वर स्वामी वैराग्यानंदगिरीजी महाराज, श्री पंचायती निरंजनी आखाडा, कर्णावती

स्वामी वैराग्यानंदगिरीजी महाराज यांना पुष्पहार घालून आणि ग्रंथ देऊन सन्मान करतांना सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे अन् उजवीकडे श्री ललितानंदगिरीजी महाराज

प्रयागराज (कुंभनगरी), १० फेब्रुवारी (वार्ता.) – भारतीय संस्कृती आणि परंपरा यांच्या रक्षणासाठी ‘कुंभमेळा’ हे चिंतनाचे महत्त्वाचे स्थान आहे. ‘आपली भारतीय संस्कृती वाचवायला हवी. हिंदुत्वाची पताका देशविदेशात फडकावली पाहिजे’, असे मला सनातनच्या प्रदर्शनाच्या ठिकाणी आल्यानंतर वाटले. वर्तमान स्थितीत हिंदू, गोमाता, यज्ञ, होम, राष्ट्रमाता यांच्यासाठी वास्तववादी कार्य करणार्‍या सनातन संस्थेसंदर्भात मी पंचायती निरंजनी आखाड्याचा ‘महामंडलेश्‍वर’ होण्याच्या नात्याने सांगतो की, ‘संपूर्ण भारतवर्षातील त्यागी, तपस्वी, श्री महंत, आचार्य, महामंडलेश्‍वर यांनी या प्रदर्शनातील विषयांचे अधिक चिंतन करून सनातन धर्माला सर्वांत वरच्या स्थानी आणण्याचे कार्य करायला हवे, असे आशीर्वचन कर्णावती (अहमदाबाद) येथील श्री पंचायती निरंजनी आखाड्याचे श्री श्री १००८ महामंडलेश्‍वर स्वामी वैराग्यानंदगिरीजी महाराज यांनी येथे केले.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने येथे लावण्यात आलेल्या ग्रंथ आणि धर्मशिक्षण फलक प्रदर्शनाला स्वामी वैराग्यानंदगिरीजी महाराज आणि हरिद्वार येथील भारतमाता मंदिराचे श्री ललितानंदगिरीजी महाराज यांनी भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी या दोघांना पुष्पहार घालून आणि ‘देवनदी गंगा की रक्षा करें !’ हा हिंदु जनजागृती समितीपुरस्कृत ग्रंथ देऊन त्यांचा सन्मान केला.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now