अनधिकृतरित्या मातीचे उत्खनन केल्याप्रकरणी मेसर्स दिलीप बिल्डकॉन कंपनीला १० कोटी रुपयांचा दंड

कुडाळ – मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामासाठी तालुक्यातील साळगाव येथे अनधिकृत माती उत्खनन केल्याचा ठपका ठेवून महामार्गाचे काम करणार्‍या मेसर्स दिलीप बिल्डकॉन या आस्थापनाला (कंपनीला) सुमारे १० कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दंडाची एकूण रक्कम १० कोटी ३६ लाख ६४ सहस्र ४०० रुपये आहे. ही रक्कम ७ दिवसांत भरण्यात यावी, असा आदेश तहसीलदारांनी कंपनीला दिला आहे.

१९ ऑक्टोबर २०१८ या दिवशी सिंधुदुर्ग जिल्हाधिकार्‍यांकडे अनुपम कांबळी यांनी याविषयीची तक्रार प्रविष्ट केली होती. या तक्रारीनुसार जिल्हाधिकार्‍यांनी कुडाळ तहसीलदारांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मेसर्स दिलीप बिल्डकॉन कंपनीने अनुमती न घेता साळगाव येथे मातीचे अनधिकृत उत्खनन केल्याप्रकरणी तलाठी साळगाव यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम ४८/७ अनुसार दंडात्मक कारवाई करण्याविषयी अहवाल सादर केला. त्यामुळे सिंधुदुर्गात पहिल्यांदाच मेसर्स दिलीप बिल्डकॉनला १० कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now