मंगलदिन हा अतीसौख्याचा ।

साधकांवर क्षणोक्षणी आनंदाची उधळण करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७६ व्या जन्मोत्सवानिमित्त ७.५.२०१८ दिवशी मला सुचलेली कविता पुढे देत आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले

मंगलदिन हा अतीसौख्याचा ।

जन्मोत्सव असे आज गुरुदेवांचा ॥ धृ. ॥

वेदमंत्र अन् जयघोष चालले रामनाथी आश्रमात ।

विविध रंगांनी सुशोभित झाले सर्व आसमंत गोव्यात ।

सुगंधी पुष्पे गुंफुनी पुष्पमाला लावल्या दारात ।

सूर सनईचे निनादती या मंगलमय वातावरणात ॥ १ ॥

पूजन करूया गुरुचरणांचे सुहास्य वदनाने ।

केशरासह अत्तर लेपन करूया भक्तीभावाने ॥

भाग्य अनोखे आज लाभले पूर्वसुकृताने ।

जन्मसोहळा करू साजरा प्रेम आदराने ॥ २ ॥

श्री गुरुचरणी लीन होऊन अर्पूया माला ।

पारावारच नाही उरला आपल्या सौख्याला ॥

हृदयातील भाव व्यक्त करूया मंगल समयाला ।

प्रेमभराने गाऊया आज राम-कृष्णलीला ॥ ३ ॥

गुरुकार्याचे वचन देऊया श्री गुरुदेवांना ।

सगळे मिळून करू विनवणी प्रेमभरे त्यांना ॥

वेदकार्य हे करून घ्या हो, भाकूया त्यांची करुणा ।

प्रसन्न होवो आपल्यावरी हा त्रिलोकीचा राणा ॥ ४ ॥

आपल्या कानी पडेल जेव्हा शब्द अमृताचा ।

देवदेवताही करतील हेवा आपल्या भाग्याचा ॥

श्री गुरुचरणी अर्पूया आपले मन अन् काया-वाचा ।

जन्मोजन्मी अशीच घडावी श्री गुरुपूजा ॥ ५ ॥’

– सौ. नीलांबरी ओझरकर, बिबवेवाडी, पुणे. (७.५.२०१८)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now