यज्ञामुळे तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधिकेतील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होणे

‘जुलै २०१८ पासून रामनाथी आश्रमातील तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांवर ‘संगीताचा काय परिणाम होतो’, याचे प्रयोगांद्वारे संशोधन करण्यात येत आहे, तसेच सप्टेंबर २०१८ पासून महर्षींच्या आज्ञेनुसार विविध यज्ञ करण्यात येत आहेत. मला तीव्र आध्यात्मिक त्रास असल्याने प्रयोग आणि यज्ञ या दोन्ही वेळेस पूर्वी आणि नंतर अशी ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे वैज्ञानिक चाचणी घेण्यात येते.

यज्ञामुळे साधिकेतील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होणे

नोव्हेंबर २०१८ मध्ये संगीताच्या एका प्रयोगात एक गाणे होण्यापूर्वी आणि झाल्यानंतर माझी यू.टी.एस्. या उपकरणाद्वारे वैज्ञानिक चाचणी घेण्यात आली. तेव्हा माझ्यातील इन्फ्रारेड आणि अल्ट्राव्हायोलेट या ऊर्जा (नकारात्मक ऊर्जा) अन् प्रभावळ २ मीटरपर्यंत होत्या; पण माझ्यात सकारात्मक ऊर्जा असल्याचे यंत्राने दाखवले नाही. ७.११.२०१८ या दिवशी रामनाथी आश्रमात ‘शूलिनी पराक्रम’ हा देवीशी संबंधित यज्ञ करण्यात आला. त्या यज्ञाच्या आधी आणि नंतर माझी ‘यू.टी.एस्.’ या उपकरणाद्वारे वैज्ञानिक चाचणी घेण्यात आली. तेव्हा यज्ञापूर्वी माझ्यात सकारात्मक ऊर्जा अजिबात नव्हती; पण यज्ञानंतर माझ्यातील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा १.९७ मीटर इतकी झाली. सर्वसाधारणपणे तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांमध्ये सकारात्मक ऊर्जा कधीच आढळत नाही आणि नामजपादी उपाय कितीही घंटे केले, तरी केवळ इन्फ्रारेड आणि अल्ट्राव्हायोलेट या नकारात्मक ऊर्जा काही प्रमाणात न्यून होतात; पण सकारात्मक ऊर्जा निर्माण होत नाही. या वैज्ञानिक चाचणीवरून यज्ञाचे एवढे सामर्थ्य लक्षात आले की, केवळ यज्ञामुळे साधकांच्या देहातील नकारात्मक ऊर्जाच केवळ नाहीशी झाली नाही, तर सकारात्मक ऊर्जाही निर्माण झाली.’

– कु. तृप्ती कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.१२.२०१८)

यज्ञामुळे होणारे आध्यात्मिक लाभ समजून घ्या !

‘यज्ञात आहुती देण्यात येणार्‍या वस्तूंच्या संदर्भात बुद्धीप्रामाण्यवादी म्हणतात, ‘यज्ञात वस्तू जाळून वाया घालवता. त्यापेक्षा त्या गरिबांना द्या.’ येथे दिलेला साधिकेचा अनुभव वाचून यज्ञामुळे होणारे लाभ कळल्यामुळे ‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांचे म्हणणे किती चुकीचे आणि हास्यास्पद आहे’, हे लक्षात येईल. यातूनच प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या नव्हे, तर आध्यात्मिक दृष्टीकोनातून पाहिल्यास हिंदु धर्मात सांगितलेल्या यज्ञांचे महत्त्व लक्षात येईल आणि त्यांचा लाभ करून घेता येईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले


Multi Language |Offline reading | PDF