प्रभु श्रीरामचंद्र केवळ हिंदूंचेच नव्हे, तर मुसलमानांचेही पूर्वज असल्याने अयोध्येतच राममंदिर होणार ! – योगऋषी रामदेवबाबा

बाटवल्या गेलेल्या मुसलमानांमध्ये आता इतकी धर्मांधता निर्माण झाली आहे की, ते त्यांचा हा इतिहास मान्य करत नाहीत. त्यामुळे योगऋषी रामदेवबाबांनी केवळ असे न बोलता ज्या ज्या मुसलमानांना ‘त्यांचे पूर्वज राम आहेत’, असे वाटते, त्यांच्या ‘घरवापसी’साठी प्रयत्न करावेत !

कर्णावती – प्रभु रामचंद्रांचे मंदिर अयोध्येतच होणार. ते अयोध्येत नाही, तर काय व्हॅटिकन सिटी किंवा मक्का अथवा मदिना येथे होणार का ? अयोध्या ही रामाची जन्मभूमी आहे, हे निर्विवाद सत्य आहे. प्रभु श्रीराम केवळ हिंदूंचेच नाही, तर मुसलमानांचेही पूर्वज आहेत, असे विधान योगऋषी रामदेवबाबा यांनी येथे केले. ते खेडा जिल्ह्यातील नडियाद येथे पत्रकारांसमवेत बोलत होते. ‘राममंदिराचे सूत्र हे मतपेढीच्या राजकारणाशी जोडलेले नाही’, असेही ते म्हणाले. काँग्रेसने योगऋषी रामदेवबाबांच्या या विधानावर टीका केली आहे. ‘त्यांचे हे विधान भाजपच्या लाभाचे आहे’, असा आरोप काँग्रेसने केला आहे. (भाजप राममंदिर उभारतच नाही, तर या विधानाचा त्याला लाभ कसा होणार ? एकीकडे काँग्रेसचे अध्यक्ष मंदिरांमध्ये जाऊन स्वतः हिंदु ब्राह्मण असल्याचा ढोल बडवत आहेत, तर दुसरीकडे हिंदूंचे आस्थास्थान असणार्‍या राममंदिराला विरोध करत आहेत. ‘हा काँग्रेसचा ढोंगीपणा हिंदूंच्या लक्षात आलेला आहे’, हे तिने लक्षात ठेवावे ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF