धर्मांतरास विरोध केल्यावरून भाजप नेत्याची हत्या करणार्‍या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या जिहादी संघटनेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक

  • ‘घरवापसी’ला विरोध करणारे, तसेच अखलाख याची हत्या केल्यानंतर आकाशपाताळ एक करणारी निधर्मी मंडळी या घटनेविषयी गेल्या ४ दिवसांत काहीच बोलली नाहीत, हे लक्षात घ्या !
  • दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणावरून छाती बडवणारे पुरोगामी, निधर्मी, तसेच हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमे या प्रकरणात जाणीवपूर्वक मौन बाळगून आहेत, हे लक्षात घ्या !
  • हिंदूंनो अशा घटना कायमस्वरूपी रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याला पर्याय नाही !

कुंभकोणम् (तंजावूर, तमिळनाडू) – मुसलमान धर्मप्रचारकांना हिंदूबहुल भागात इस्लामचा प्रसार करण्यास विरोध केल्याचा राग ठेवून काही धर्मांधांनी भाजपचे कार्यकर्ते रामलिंगम् यांची ५ फेब्रुवारीला निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी ५ धर्मांधांना अटक केली असून काही जण पसार (फरार) झाले आहेत. अटक करण्यात आलेले जिहादी धर्मांध हे ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या जिहादी संघटनेचे कार्यकर्ते आहेत, असे सांगण्यात येत आहे. हत्येच्या घटनेमुळे या भागात धार्मिक तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी अधिक कुमक मागवून बंदोबस्त ठेवला आहे.

१. ५ फेब्रुवारीला कुंभकोणम्मधील हिंदूबहुल भागात काही मुसलमान धर्मप्रचारक शिरले आणि इस्लामचा प्रसार करू लागले. ही गोष्ट रामलिंगम् यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्या धर्मप्रसारकांना विरोध केला. ‘आम्ही आमच्या देवतांची पूजा करतो. तुम्ही तुमच्या धर्माचे पालन करा’, असे रामलिंगम् यांनी धर्मप्रसारकांना सांगितल्याने त्यांना राग आला.

२. हा राग मनात ठेवून त्या रात्री काही धर्मांधांनी रामलिंगम् यांच्यावर तीक्ष्ण शस्त्रांनी आक्रमण केले. प्रथम धर्मांधांनी रामलिंगम् यांचे हात मुळापासून तोडले आणि नंतर त्यांच्यावर जीवघेणे वार केले. त्यात रामलिंगम् यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now