आरक्षणावरून राजस्थानमध्ये गुर्जरांकडून पुन्हा आंदोलन

रेल्वेमार्ग अडवल्याने ७ गाड्या रहित

  • आरक्षणामुळे भारताची अधोगती झाली आहे, भारतियांच्या हे कधी लक्षात येणार ? भारतातील आरक्षणाची विकृती नष्ट झाल्याविना भारत महासत्ता होऊ शकत नाही, ही वस्तूस्थिती आहे !
  • गेल्या १३ वर्षांत गुर्जरांनी आरक्षणासाठी ६ आंदोलने केली. यांत ४ वेळा भाजप, तर २ वेळा काँग्रेसचे सरकार होते. या आंदोलनाच्या काळात ५ वेळा रेल्वेमार्ग रोखण्यात आले. आतापर्यंतच्या या आंदोलनांमध्ये हिंसाचार झाल्याने ७२ जणांचा बळी गेला आहे.

 

गुर्जर आरक्षण संघर्ष समिती’चे संयोजक कर्नल किरोडीसिंह बैंसला

जयपूर – राजस्थानमध्ये गुर्जर समाजाने पुन्हा एकदा आरक्षणासाठी आंदोलन चालू कले आहे. सवाईमाधोपूरमधील मलारना आणि नीमोदा रेल्वेस्थानकाच्या मध्ये असलेल्या रेल्वेरुळावर तंबू ठोकून आंदोलक तेथे ठाण मांडून बसले आहेत. यामुळे ७ गाड्या रहित करण्यात आल्या आहेत, तर २१ गाड्यांचा मार्ग पालटण्यात आला. गुर्जरांना राजस्थानमध्ये नोकरी आणि शिक्षण यांमध्ये ५ टक्के आरक्षण मिळावे, यासाठी ‘गुर्जर आरक्षण संघर्ष समिती’चे संयोजक कर्नल किरोडीसिंह बैंसला यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले जात आहे.

१. कर्नल किरोडीसिंह बैंसला यांनी सांगितले, ‘जसे आर्थिक दुर्बलांना केंद्र सरकारने आरक्षण दिले आहे, तसेच आम्हाला हवे आहे. गुर्जर समाजाला आरक्षण मिळाल्याविना आता माघार घेणार नाही. सरकारशी आता कोणतीही तडजोड करणार नाही. सरकारला दिलेली मुदत संपुष्टात आली आहे’. ‘सरकारी मालमत्तेची कोणतीही हानी करू नये, तसेच सामान्य नागरिक, महिला आणि व्यापारी यांना कोणताही त्रास देऊ नये’, अशा सूचनाही बैंसला यांनी आंदोलकांना दिल्या आहेत.

२. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सांगितले, ‘गुर्जर आंदोलकांशी सरकार चर्चा करण्यासाठी सिद्ध आहे.’ यावर बैंसला यांनी म्हटले की, सरकारला चर्चेसाठी आता रेल्वेरुळावर यावे लागेल.


Multi Language |Offline reading | PDF