‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या जानेवारी २०१९ मधील संशोधन कार्याचा आढावा !

‘आजकाल अनेक लोकांचा संतांच्या अनुभवसिद्ध ज्ञानापेक्षा वैज्ञानिक उपकरणांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीवर अधिक विश्‍वास असतो. त्यामुळे वर्ष २०१४ पासून ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली वैज्ञानिक उपकरणांच्या माध्यमातूनही संशोधन करण्यात येत आहे. ‘हिंदु धर्मातील आचार, धार्मिक कृती, सामाजिक कृती (उदा. दीपप्रज्वलन, उद्घाटन इत्यादी), यज्ञ, अनुष्ठान, मंत्रपठण इत्यादी विषयांचे आध्यात्मिक महत्त्व आधुनिक वैज्ञानिक परिभाषेत समाजाला समजावून सांगणे’, हा या संशोधनाचा उद्देश आहे. यासाठी ‘इलेक्ट्रोसोमॅटोग्राफिक स्कॅनिंग’, ‘युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर (यू.टी.एस्.)’, ‘पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी (पिप)’, ‘थर्मल इमेजिंग’, ‘गॅस डिस्चार्ज व्हिजुअलायझेशन (जी.डी.व्ही.)’ इत्यादी आधुनिक वैज्ञानिक उपकरणे आणि प्रणाली यांचे साहाय्य घेण्यात येत आहे. या संशोधन कार्याला पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील ज्ञानाची, म्हणजे सूक्ष्म परीक्षणाची जोड देऊन विश्‍लेषण करण्यात येत आहे. या संशोधन कार्याचा जानेवारी २०१९ या मासातील आढावा येथे देत आहोत.   

(पूर्वार्ध)

१. जानेवारी २०१९ मध्ये ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने ऊर्जा आणि प्रभामंडळ मापक यंत्रांच्या साहाय्याने एकूण ७७ प्रयोगांतर्गत केलेल्या ७९ चाचण्यांमध्ये ३५७ घटक/सहभागी व्यक्ती यांच्या एकूण ४४८ मोजण्यांच्या नोंदी करण्यात आलेल्या असणे

जानेवारी २०१९ मध्ये ‘युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर (यू.टी.एस्.)’ आणि ‘गॅस डिस्चार्ज व्हिजुअलायझेशन (जी.डी.व्ही.)’ ही ऊर्जा आणि प्रभामंडळ मापक यंत्रे अन् प्रणाली यांच्या माध्यमातून करण्यात आलेले प्रयोग, चाचण्या, घटक आणि मोजण्यांच्या नोंदी यांची संख्या पुढील सारणीत दिली आहे.

१ अ. ‘प्रयोग, चाचण्या, घटक आणि मोजण्यांच्या नोंदी’ या संज्ञांचे अर्थ : या संज्ञांचे अर्थ ‘सात्त्विक आणि असात्त्विक नक्षी असलेल्या सोन्याच्या अलंकारांचा व्यक्तीवर आध्यात्मिक स्तरावर होणारा परिणाम’ अभ्यासण्यासाठी केलेल्या एका प्रयोगाचे उदाहरण घेऊन त्यातून आपण समजून घेऊया. या प्रयोगात वाईट शक्तींचा त्रास असलेल्या ५ साधिका आणि वाईट शक्तींचा त्रास नसलेल्या ५ साधिका सहभागी झाल्या होत्या. या प्रयोगाच्या संदर्भात ‘प्रयोग, चाचण्या, घटक आणि मोजण्यांच्या नोंदी’ या संज्ञांचे अर्थ पुढीलप्रमाणे आहेत.

१ अ १. प्रयोग : प्रयोगातील प्रत्येक साधिकेने सात्त्विक नक्षी असलेला हार आणि असात्त्विक नक्षी असलेला हार घालण्यापूर्वी अन् घातल्यानंतर वरील सारणीमध्ये दिलेल्या यंत्रांपैकी एका यंत्राद्वारे (उदा. ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे) केलेल्या मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या. हा एक प्रयोग झाला.

१ अ २. चाचण्या : या एका प्रयोगात ‘सात्त्विक नक्षी असलेल्या हाराचा परिणाम अभ्यासणे’ आणि ‘असात्त्विक नक्षी असलेल्या हाराचा परिणाम अभ्यासणे’, अशा २ चाचण्या आहेत.

१ अ ३. घटक : या प्रयोगामध्ये वाईट शक्तींचा त्रास असलेल्या ५ साधिका आणि वाईट शक्तींचा त्रास नसलेल्या ५ साधिका अशा एकूण १० साधिका, म्हणजे १० घटक आहेत.

१ अ ४. मोजण्यांच्या नोंदी : या प्रयोगामध्ये प्रत्येक साधिकेच्या संदर्भात तिने सात्त्विक नक्षी असलेला हार घालण्यापूर्वी आणि घातल्यानंतर, तसेच असात्त्विक नक्षी असलेला हार घालण्यापूर्वी अन् घातल्यानंतर, अशा प्रकारे यंत्राद्वारे केलेल्या मोजण्यांच्या एकूण ४ नोंदी करण्यात आल्या. याचा अर्थ १० साधिकांच्या यंत्राद्वारे केलेल्या एकूण ४० मोजण्यांच्या नोंदी झाल्या.

२. जानेवारी २०१९ मध्ये ‘यू.टी.एस्.’ या यंत्राच्या साहाय्याने केलेल्या प्रयोगांमध्ये केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे आध्यात्मिक विश्‍लेषण करून ७ संशोधन अहवाल बनवण्यात आलेले असणे

जानेवारी मासात बनवलेल्या ७ संशोधन अहवालांतील ठळक निरीक्षणे आणि निष्कर्ष पुढील सारणीत दिले आहेत. ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांच्यातील नकारात्मक ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा आणि एकूण प्रभावळ (ऑरा) मोजता येते. सामान्य व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये नकारात्मक ऊर्जा असू शकते; परंतु सकारात्मक ऊर्जा असेलच, असे नाही. ‘सामान्य व्यक्ती किंवा वस्तू यांची एकूण प्रभावळ साधारण १ मीटर असते’, हे लक्षात घेऊन पुढील सारणी वाचावी.

टीप १ – आध्यात्मिक त्रास : आध्यात्मिक त्रास असणे, म्हणजे व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा अधिक असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद त्रास असणे. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे करू शकतात.

टीप २ – ६० टक्के आध्यात्मिक पातळीचे महत्त्व : ‘ईश्‍वराची आध्यात्मिक पातळी जर १०० टक्के मानली आणि निर्जीव वस्तूंची १ टक्के मानली, तर या कलियुगात सर्वसाधारण मनुष्याची आध्यात्मिक पातळी २० टक्के असते. या पातळीची व्यक्ती केवळ स्वतःच्या सुख-दुःखाचा विचार करते. तिचे समाजाशी काही देणे-घेणे नसते आणि ‘मीच सर्व करते’, असा तिचा विचार असतो. आध्यात्मिक पातळी ३० टक्के होतेे, तेव्हा ती ईश्‍वराचे अस्तित्व थोड्या प्रमाणात मान्य करू लागते, तसेच साधना आणि सेवा करू लागते. मायेची आणि ईश्‍वरप्राप्तीची ओढ सारखीच झाली की, व्यक्तीची आध्यात्मिक पातळी ५० टक्के होते. आध्यात्मिक पातळी जेव्हा ६० टक्के होते, तेव्हा ती व्यक्ती मायेपासून अलिप्त होऊ लागते. तिच्या मनोलयाला आरंभ होतो आणि तिला विश्‍वमनातील विचार ग्रहण होऊ लागतात. मृत्यूनंतर ती जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून सुटून तिला महर्लोकात स्थान प्राप्त होते.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

३. जानेवारी २०१९ मध्ये ३ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग

जानेवारी २०१९ मध्ये ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने ३ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग घेऊन पुढील शोधप्रबंध सादर करण्यात आले.

३ अ. या शोधप्रबंधांच्या सहभागाविषयी १२ नियतकालिकांत ४ भाषांमध्ये १३ वृत्ते प्रसारित : आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदांमध्ये सादर केलेल्या शोधप्रबंधांची वृत्ते पुढील नियतकालिकांत प्रसिद्ध झाली.

४. ‘विश्‍वविद्यालया’च्या ८ प्रबंधांचा पुढे होणार्‍या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदांकडून स्वीकार

– कु. प्रियांका लोटलीकर आणि श्री. शॉन क्लार्क, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (६.२.२०१९)

ई-मेल : [email protected]

(उत्तरार्ध वाचा पुढील रविवारी)

पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ

‘गाढवाला गुळाची चव काय ?’, ही म्हण सार्थ करणारे तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने जुलै २०१६ पासून ३१.१.२०१९ पर्यंत ४१ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांत शोधनिबंध सादर केले. नुकतेच अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिना येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर केलेल्या ‘समाजसेवेमुळे आध्यात्मिक उन्नती होते का ?’, तसेच पुरी, ओडिशा येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर केलेल्या ‘खरे नेतृत्व उच्च आध्यात्मिक स्तर असलेली व्यक्तीच करू शकते !’ या शोधनिबंधांना ‘सर्वोत्कृष्ट शोधनिबंध’, म्हणून घोषित करण्यात आले. सर्व शोधनिबंधांचे संशोधनकर्ते आणि लेखक परात्पर गुरु डॉ. आठवले आहेत. त्यांच्या हिंदु धर्म, संस्कृती इत्यादी विषयांवरील संशोधनकार्याच्या एक लक्षांश तरी कार्य तथाकथित बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी केले आहे का ? ‘गाढवाला गुळाची चव काय ?’, अशा वृत्तीच्या बुद्धीप्रामाण्यवाद्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये काय कळणार !’

– (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.२.२०१९)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव म्हणजेच पंचज्ञानेंद्रिये, तसेच मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.


Multi Language |Offline reading | PDF