‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन (भाग १)’ या ग्रंथाचे वितरण विविध उपक्रमांमध्ये करा !

साधकांना सूचना

‘साधकांना भवसागरातून तारणारे आणि अल्प कालावधीत धर्म, अध्यात्म आदी सर्वच विषयांवरील लिखाण अखिल मानवजातीपर्यंत पोहोचवून जगदोद्धाराचे कार्य करणारे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जीवनाविषयी सर्वांनाच कुतूहल आहेे. गुरुदेवांचे पूर्वायुष्य, त्यांचा सात्त्विक आणि संस्कारी परिवार, त्यांनी निर्मिलेला ‘गुरुकृपायोग’ हा साधनामार्ग अन् त्यांनी विहंगम गतीने केलेले धर्म आणि अध्यात्म प्रसाराचे कार्य, या संदर्भातील माहिती जाणून घेण्यास सर्वच जण उत्सुक असतात. ही सर्व माहिती ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन (भाग १)’ या ग्रंथात एकत्रित केली आहे. हे जीवनचरित्र सर्वांपर्यंत पोहोचावे, यासाठी हा ग्रंथ विशेष सवलतीत २०० रुपये अर्पणमूल्यात उपलब्ध करून देण्यात आला आहे. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या विविध उपक्रमांमध्ये (उदा. हिंदु राष्ट्र-जागृती सभा, हिंदू अधिवेशने, शिबिरे) या ग्रंथाचे वितरण करावे. साधकांनी अधिकाधिक प्रयत्न करून परात्पर गुरूंचे जीवनचरित्र समाजापर्यंत पोहोचवावे.’

– (सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.


Multi Language |Offline reading | PDF