लहान वयातही खेळण्यापेक्षा सेवेची अधिक ओढ असलेला सोलापूर येथील कु. ऋषी केंभावी याची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असल्याचे घोषित !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. ऋषी केंभावीे एक आहे !

कु. ऋषी यांचा सत्कार करतांना सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

सोलापूर, ८ फेब्रुवारी (वार्ता.)  सेवेची तळमळ आणि प.पू. गुरुदेवांप्रती भाव असणारा सनातनचा बालसाधक कु. ऋषी केंभावी (वय १० वर्षे) याची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के आहे, अशी आनंदवार्ता सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी एका सत्संगात दिली. या वेळी कु. ऋषीचे वडील श्री. दयानंद केंभावी आणि आई सौ. अपर्णा केंभावी उपस्थित होत्या. याप्रसंगी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी कु. ऋषी याचा भेटवस्तू देऊन सत्कार केला. या वेळी उपस्थित असलेल्या साधकांनी कु. ऋषी याची गुणवैशिष्ट्ये सांगितली.

या सत्संगाच्या आदल्या दिवशीच सोलापूर येथील ऐतिहासिक हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली. सभेत आलेल्या अनुभूती साधक कृतज्ञताभावाने सांगत होते. सर्वजण हा भावसोहळा अनुभवत असतांना कु. ऋषी याच्या आध्यात्मिक प्रगतीच्या वार्तेने सर्वांचा आनंद द्विगुणित झाला. ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. दीपाली मतकर यांनी सांगितले की, ऋषीमध्ये सेवेची पुष्कळ तळमळ आहे. शाळेतून आल्यावर त्याला जेवढा वेळ मिळेल, त्या वेळेत तो उत्साहाने सेवा करायचा.

कु. ऋषीप्रमाणे सर्व साधकांनी साधनेचे प्रयत्न केल्यास त्यांचीही प्रगती जलद होईल ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

कु. ऋषीने सोलापूर येथील सभेत मनापासून सेवा केली. साधकांनीही त्याच्याप्रमाणे प्रयत्न केल्यास त्यांचीही प्रगती होईल. ऋषीकडे पाहूनच चांगले वाटते. त्याचा तोंडवळा सात्त्विक आहे. त्याला लहान वयात खेळण्याहून अधिक सेवेची आवड आहे. ऋषीसारखीच दैवी बालके हिंदु राष्ट्रातील पुढच्या पिढीला मार्गदर्शन करतील. साधक पालकांनी लहान वयातच मुलांच्या साधनेकडे लक्ष द्यावे आणि त्यांच्यावर साधनेचे संस्कार करावेत.

कु. ऋषीच्या आई-वडिलांनी व्यक्त केलेले मनोगत

‘आज एका साधकाविषयी आनंदवार्ता ऐकायला मिळेल’, असे वाटत होते ! – दयानंद केंभावी (कु. ऋषीचे वडील)

‘आज एका साधकाविषयी आनंदवार्ता ऐकायला मिळेल’, असे वाटत होते. त्यात कु. ऋषीच्या प्रगतीची वार्ता ऐकून पुष्कळ आनंद झाला.

‘कु. ऋषीविषयी चांगली वार्ता कळणार’, असे जाणवत होते ! – सौ. अपर्णा केंभावी (कु. ऋषीची आई)

‘कु. ऋषीविषयी चांगली वार्ता कळणार’, असे जाणवत होते; पण माझी अपेक्षा नको, म्हणून त्या विचारांकडे मी दुर्लक्ष केले. प्रत्यक्षात त्याच्याविषयी आनंदवार्ता मिळाल्याने कृतज्ञता वाटली.

कु. ऋषी केंभावी

सूक्ष्मातील कळणारा आणि सतत आनंदी असणारा सोलापूर येथील कु. ऋषी केंभावी (वय १० वर्षे) !

१. गर्भारपण

१ अ. ‘नवव्या मासात मी नामजप करायचे. तेव्हा बाळ शांत असायचे.

१ आ. आरती, क्षात्रगीते आणि भजने लावल्यावर पोटातील बाळाची हालचाल वाढल्याचे जाणवणे : ‘सोनोग्राफी’ करतांना आरती आणि क्षात्रगीते लावल्यावर माझ्या पोटातील बाळाच्या हालचालींत वाढ व्हायची. भजने लावलेली असतांनाही पोटातील बाळाची हालचाल जाणवायची.

२. जन्मानंतर

२ अ. बाळाला ऑक्सिजन अल्प पडल्यामुळे ते जन्मतःच निळे दिसणे आणि ‘त्याचे आई-वडील दोघेही सेवेत असल्यामुळे गुरुकृपेने बाळ वाचले’, असे वाटणे : ऋषी जन्मल्यावर निळा दिसत होता आणि त्याचे ओठ गुलाबी दिसत होते. तेव्हा आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘श्रीकृष्णच जन्माला आला आहे’, असे वाटते.’’ आम्हाला नंतर समजले, ‘त्याला ऑक्सिजन अल्प पडल्यामुळे तो असा दिसत होता.’ तो गुरुकृपेमुळे मरणाच्या दारातून परत आला होता; कारण ‘मी आणि त्याचे बाबा सेवेत होतो’, असे मला वाटले.’

– सौ. अपर्णा केंभावी (आई), सोलापूर

३. जन्म ते २ वर्षे

३ अ. शांत : ‘ऋषी लहानपणापासून शांत होता. भजने लावली की, तो शांत असायचा.

३ आ. त्याचा जन्म ऋषिपंचमीच्या दिवशी झाला; म्हणून त्याचे नाव ‘ऋषी’ ठेवले.

३ इ. ७ व्या मासात तो स्वतःचा पाळणा ओढून नेत असे. त्यामुळे ‘त्याच्यात पुष्कळ शक्ती आहे’, असे आम्हाला वाटायचे.

३ ई. तो कुठल्याच गोेष्टीसाठी हट्ट करत नसे.

३ उ. सूक्ष्मातील कळण्याची क्षमता : तो दीड वर्षाचा होता. तेव्हा आमच्या खालच्या माळ्यावरील आजी देवाघरी गेल्या होत्या. तेव्हा आम्ही त्याला विचारले, ‘‘खाली काय झाले आहे ?’’ त्याने सांगितले, ‘‘श्रीराम जय राम जय जय राम ।’’ त्या वेळी ‘एवढ्याशा मुलाला कसे कळले ?’, याचे आम्हाला आश्‍चर्य वाटले.

४. दुसर्‍या वर्षापासून आतापर्यंत जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

४ अ. आनंदी : तो सतत आनंदी असतो. त्यामुळे त्याला पाहिल्यावर आम्हालाही आनंद होतो.

४ आ. प्राण्यांविषयी प्रेम : एकदा आमच्या घराजवळ कुत्र्याचे  पिल्लू पहाटे चार वाजल्यापासून ओरडत होते. ते ऋषीला सहन झाले नाही; म्हणून तो ‘त्याला काय झाले ?’, हे पहाण्यासाठी लगेच गेला.

४ इ. ऋषी प्रत्येक गोष्ट विचारून करतो. तो वेळेचे पालन करतो. एखादी गोष्ट दुसर्‍याला देण्याची त्याची सिद्धता असते.

४ ई. देवाची आवड : मे मासात आणि दिवाळीच्या सुट्टीत आमच्याकडे त्याचे चुलत भाऊ यायचे. तेव्हा दुपारच्या वेळेत सर्व मुलांना घेऊन तो ‘देवघर, देवाची पूजा, आरती आणि घंटा वाजवणे’, असे खेळ खेळायचा. लहान असतांना तो गणपतीची मूर्ती घेऊन खेळायचा; परंतु नंतर तो तिची पूजा करू लागला. तो लहानपणी कृष्ण आणि शिव यांचा नामजप करायचा.

४ उ. सेवेची आवड

१. ऋषी तबला आणि पोहण्याच्या वर्गाला जातो; परंतु त्या वेळेत एखादी सेवा आली, तर तो सेवेला प्राधान्य देतो.

२. आम्ही दोघे प्रासंगिक सेवा करतो. त्यालाही सेवा करायला आवडते. तो सतत सांगतो, ‘‘मला पूर्णवेळ सेवाच करायची आहे.’’

४ ऊ. चुकांविषयीची संवेदनशीलता : त्याच्याकडून एकदा झालेली चूक परत होत नाही. तो चुकांतून शिकतो आणि आम्हालाही ‘आमचे कुठे चुकते ?’, हे सांगतो.

४ ए. सद्गुरु (कु.) स्वातीताई शिबिराला किंवा हिंदु राष्ट्र-जागृती सभेला सोलापूरला आल्यावर त्याची आवर्जून भेट घ्यायच्या.

५. स्वभावदोष : मनाविरुद्ध झाल्यावर वाईट वाटणे’

– श्री. दयानंद आणि सौ. अपर्णा केंभावी (आई-वडील), सोलापूर (डिसेंबर २०१८)


Multi Language |Offline reading | PDF