महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली राजुरा (जिल्हा चंद्रपूर) येथील चि. मनस्वी मुकेश काकडे (वय २ वर्षे)!

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. मनस्वी काकडे एक आहे !

चि. मनस्वी काकडे

१. जन्मापूर्वी

‘मला गर्भारपणात कोणताही त्रास झाला नाही.

२. जन्मानंतर

२ अ. शांत स्वभाव : चि. मनस्वीला तेल लावतांना किंवा अंघोळ घालतांना ती कधीच रडली नाही.

२ आ. दीड वर्षाची असल्यापासून ती स्वतःच्या हाताने जेवते. तिला जेवण भरवावे लागत नाही.’

– सौ. नेहा मुकेश काकडे (आई), राजुरा, जिल्हा चंद्रपूर.

२ इ. उत्तम स्मरणशक्ती : ‘तिला कोणतीही गोष्ट एकदाच सांगितली, तरी तिच्या लगेच लक्षात रहाते. आम्ही एखादी गोष्ट विसरल्यास ती आम्हाला त्याची आठवण करून देते.’ – श्री. विनोद कोंगरे (आजोबा)

२ ई. ‘तिचे वडील कार्यालयातून घरी आल्यावर ती त्यांना पाणी आणून देते. ती त्यांच्या बॅगेतून जेवणाचा डबा काढून ठेवते.

२ उ. कोणी घरी आल्यास ती त्यांना पाणी देते आणि मला चहा करायला सांगते.

२ ऊ. सात्त्विक गोष्टींची आवड : तिला कुंकू लावायला आणि अलंकार घालायला आवडतात. ती प्रतिदिन आई-वडील आणि आजी-आजोबा यांना नमस्कार करते.’

– सौ. नेहा मुकेश काकडे

२ ए. चुणचुणीतपणा आणि सात्त्विक हालचाली यांमुळे चि. मनस्वीकडे बघून आनंद होणे : ‘ती चंद्रपूर येथील गुरुपौर्णिमेला आली असतांना समवयस्क मुलांशी खेळत होती. तेव्हा खेळण्यातील आणि वागण्यातील वेगळेपणामुळे ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. त्या वेळी तिच्यातील ‘चुणचुणीतपणा आणि संवेदनशीलता’ हे गुण लक्षात येत होते. तिच्या हालचालीही सात्त्विक होत्या. तिच्याकडे बघून आनंद होत होता.’ – सौ. सुनंदा पुरुषोत्तम हरणे, वर्धा

२ ऐ. धर्माचरण करणे : ‘२ वर्षांची असतांना मनस्वीच्या वाढदिवसाला तिच्या बाबांनी केक आणला होता. तेव्हा तिने रडून बाबांना केक न कापण्याविषयी सांगितले आणि त्यांनाही केक कापू दिला नाही.’ – श्री. विनोद कोंगरे

२ ओ. देवाची ओढ

१. ‘तिला भूक लागली असेल किंवा झोप आली असेल, तरच ती रडत असे. भ्रमणभाषवर श्रीकृष्ण किंवा श्रीराम यांचा पाळणा लावल्यावर ती शांत झोपत असे.

२. तिला पूजा करायला आवडते. ती श्रीकृष्णाची मूर्ती पुसून त्याला वस्त्र घालते. ती देवाला उदबत्ती ओवाळते आणि प्रदक्षिणा घालतेे. आम्ही श्‍लोक म्हणत असतांना ती हात जोडून उभी रहाते आणि नंतर जयघोषही करते.

३. ‘जय श्रीकृष्ण’ असे म्हटल्यावर ती दोन्ही हात वर करते. ती कपाळाला विभूती लावते आणि डोके टेकवून नमस्कार करते. तिला टाळ आणि घंटा वाजवायला पुष्कळ आवडते. तिला तुळशीला पाणी घालायला आणि उदबत्ती लावायला आवडते.’

– सौ. नेहा मुकेश काकडे

४. ‘मंदिरात गेल्यावर ती मंदिराच्या पायरीला नियमितपणे नमस्कार करते.’ – श्री. विनोद कोंगरे

२ औ. भाव

१. ‘तिला ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ पुष्कळ आवडतो. तो ग्रंथ हातात घेऊन ‘आबा आहेत’, असे म्हणून ती त्यांच्या छायाचित्राला नमस्कार करते.’ – सौ. नेहा मुकेश काकडे

२. ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ हातात घेतल्यावर ती तो कुणालाच द्यायला सिद्ध नव्हती.’ – श्री. विनोद कोंगरे

३. स्वभावदोष

हट्टीपणा’ – सौ. नेहा मुकेश काकडे (१२.९.२०१८)

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले                    

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/०६MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

चि. मनस्वी हिची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित !

पू. अशोक पात्रीकर यांच्याकडून भेटवस्तू स्वीकारतांना चि. मनस्वी काकडे (आईच्या कडेवर असलेली)

वर्धा, ८ फेब्रुवारी (वार्ता.)  राजुरा (जिल्हा चंद्रपूर) येथील बालसाधिका चि. मनस्वी मुकेश काकडे (वय २ वर्षे ७ मास) हिची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असल्याचे ६ फेब्रुवारी या दिवशी एका सत्संगात घोषित करण्यात आले. यानिमित्त सनातन संस्थेचे पू. अशोक पात्रीकर यांनी तिचा भेटवस्तू देऊन सत्कार केला. या वेळी चि. मनस्वीचे आई-वडील सौ. नेहा आणि श्री. मुकेश काकडे, सौ. सुनंदा काकडे (आजी), ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. विनोद कोंगरे (आजोबा) आणि सनातनचे साधक उपस्थित होते. चि. मनस्वीच्या आध्यात्मिक प्रगतीची वार्ता ऐकून उपस्थित साधकांनी भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या चरणी भावपूर्ण कृतज्ञता व्यक्त केली.

 

 


Multi Language |Offline reading | PDF