हिंदूंच्या धार्मिक परंपरेचा अवमान करून धर्महानी करणार्‍यांचा प्रतिकार होणे आवश्यक !

‘शबरीमला मंदिरात प्राचीन परंपरेनुसार १० ते ५० वर्षे वयोगटाच्या महिलांना प्रवेशबंदी आहे; मात्र सर्वोच्च न्यायालयाने सर्व वयोगटांतील महिलांना मंदिरात प्रवेश देण्याविषयीच्या आदेशानंतर २२.१०.२०१८ या दिवशी सामाजिक कार्यकर्त्या तथा शिक्षिका बिंदू थँक कल्याणी यांनी मंदिरात प्रवेशाचा प्रयत्न केला; मात्र भाविक महिलांनी तो हाणून पाडला. यामुळे बिंदू यांना सामाजिक बहिष्कारालाच सामोरे जावे लागले. शाळेत परतल्यानंतर अन्य शिक्षिकांनी त्यांना टोमणे मारले. बिंदू त्यांच्या मित्राच्या घरी गेल्यावर तेथेही त्यांचा अपमान करण्यात आला. त्या ज्या घरात भाड्याने रहात होत्या, त्या घरमालकाने त्यांना घर सोडण्यास भाग पाडले. बिंदू ज्या शाळेत शिकवत होत्या, तेथेच त्यांची कन्या प्राथमिक वर्गात शिकत होती. तिलाही वर्गमैत्रिणींनी टोचून बोलणे चालू केल्यामुळे आणि सहकार्य न करण्याची भूमिका घेतल्यामुळे कंटाळून बिंदू यांनी तमिळनाडूतील शाळेत मुलीला प्रवेश घेण्याचे ठरवले; मात्र तेथेही काही निदर्शक पोहोचले आणि त्यांनी शाळा व्यवस्थापनाला बिंदूच्या मुलीचा प्रवेश रहित करण्यास भाग पाडले.’ (दैनिक सनातन प्रभात, १९.१.२०१९)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now