मुख्यमंत्री असतांना स्वतःचे पुतळे उभारण्यावर खर्च केलेला जनतेचा पैसा परत करण्याचा आदेश

मायावती यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका !

नवी देहली – मुख्यमंत्री असतांना उभारण्यात आलेल्या स्मारकांवर आणि स्वत:च्या पुतळ्यांवर खर्च करण्यात आलेला पैसा परत करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांना दिला आहे.

या प्रकरणी वर्ष २००९ मध्ये करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना हा आदेश देण्यात आला. या प्रकरणातील पुढील सुनावणी २ एप्रिल या दिवशी होणार आहे. या प्रकरणावर जवळपास १० वर्षांनी सुनावणी झाली. (इतक्या महत्त्वाच्या प्रकरणावरील सुनावणी १० वर्षांनी होत असेल, तर जनतेच्या पैशांची उधळपट्टी करणार्‍या राज्यकर्त्यांवर चाप कसा बसणार ? – संपादक) मायावती मुख्यमंत्री असतांना राज्यात अनेक ठिकाणी हत्तींचे पुतळे उभारण्यात आले. तसेच मायावतींनी स्वत:चेही अनेक पुतळे उभे केले. काही उद्यानेसुद्धा उभारली. बसपचे ज्येष्ठ नेते कांशीराम आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही पुतळे त्यांनी उभारले. यासाठी ६ सहस्र कोटी रुपयांहून अधिक खर्च झाला होता.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now