(म्हणे) ‘पोप फ्रान्सिस यांना ‘लैंगिक गुलामगिरी’ हा शब्द अभिप्रेत नसून त्यांना ‘लैंगिक अत्याचार’ म्हणायचे होते !’ – व्हॅटिकनची मखलाशी

धर्मांतरित होणारे हिंदू चर्चचे खरे स्वरूप जाणून घेतील तो सुदिन !

व्हॅटिकन (रोम) – व्हॅटिकनमधील काही पाद्री आणि बिशप यांच्याकडून नन्सचे लैंगिक शोषण करण्यात आले आहे, अशी स्वीकृती ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस जेव्हा संयुक्त अरब अमिरातमधील त्यांचा दौरा आटोपून व्हॅटिकन सिटीकडे मार्गस्थ झाले, त्या वेळी पत्रकारांच्या प्रश्‍नांना उत्तर देतांना दिली. या वेळी त्यांनी पाद्री आणि बिशप यांच्या कृत्यांचा निषेध करून त्यांना ‘लैंगिक गुलामगिरी’ म्हटले. पोप यांचे मुख्यालय असलेल्या ‘व्हॅटिकन’ने यावर खुलासा देतांना ‘पोप फ्रान्सिस यांना ‘लैंगिक गुलामगिरी’ हा शब्दप्रयोग अभिप्रेत नसून ‘लैंगिक अत्याचार’ अथवा ‘अधिकारांचा गैरवापर करून शारीरिक संबंध’ असे म्हणायचे होते’ असे म्हटले आहे.

पाद्य्रांकडून नन्सचे लैंगिक शोषण झाल्याची प्रकरणे जगभरातील सर्व देशांत घडत आहेत आणि तेथील प्रसारमाध्यमांत प्रकाशित होत आहेत. एवढेच नव्हे, तर याहूनही भयानक प्रकार म्हणजे अमेरिका, युरोप येथी, देश आणि जगातील इतर देशांतही पाद्य्रांकडून अल्पवयीन मुला-मुलींचे लैंगिक शोषण मोठ्या प्रमाणात झाल्याचे उघडकीस आले आहे. स्वतः पोप फ्रान्सिस यांनी यापूर्वी अमेरिकेतील पेन्सिल्व्हेनिया येथील चर्चमधून लहान मुलांच्या झालेल्या लैंगिक शोषणानंतर ‘कॅथलिक चर्च याकडे गांभीर्याने आणि तत्परतेने पाहील’, असे सांगितले होते. म्हणजेच हे प्रकार त्यांना ज्ञात होते. (भारतात निष्पाप आणि भोळ्याभाबड्या हिंदूंचे धर्मांतर करतांना त्यांना लालूच दाखवणे, गंभीर आजार बरे होतात असे सांगून फसवणूक करणे, बळजोरी करणे, धमक्या देणे असे प्रकार अवलंबले जातात. याच्याच जोडीला अल्पवयीन मुला-मुलींचे आणि नन्सचे लैंगिक शोषण करणारे ख्रिस्ती मिशनरी किती पापांनी बरबटले आहेत, हे लक्षात येते. अशा लोकांनी चालवलेला पंथ त्यांच्या अनुयायांना सात्त्विकता कशी प्रदान करू शकेल ? – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now