सनातनद्वेषाची कावीळ झालेल्या ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीकडून हिंदु राष्ट्र-जागृती सभेविषयी अपप्रचार !

राष्ट्र आणि धर्म यांची सद्यस्थिती मांडून त्यावर उपाययोजना सांगणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभेविषयी अपप्रचार करणे, हा हिंदुद्वेषच होय. अशा वृत्तवाहिन्या जनतेला दिशा काय देणार ?

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या सोलापूर येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेविषयी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने ‘सनातनी विखार’ आणि ‘सनातनची सभा वादात अडकण्याची शक्यता’ असे मथळे देऊन पूर्वग्रहदूषित वृत्त प्रसारित केले.

‘सनातनच्या या सभा हिंदु तरुणांना भडकावणार्‍या असून यामुळे सनातन आणि त्यांच्या सभा चौकशीच्या रडावर येण्याची शक्यता आहे’, अशा आशयाचे वृत्त प्रसारित केले. (हिंदु जनजागृती समितीने समाजात जागृती करण्यासाठी आतापर्यंत १ सहस्रांहून अधिक सभा घेतल्या आहेत. या सभांमुळे गावातील तंटे मिटणे, व्यसनमुक्त होणे, हिंदूंमध्ये संघटन होऊन ते हिंदू धर्माचरण करू लागणे आदी सकारात्मक पालट मोठ्या प्रमाणात झाले आहेत; मात्र सभेमुळे कुठे दंगल वा गोंधळ झाला आहे, अशी एकही घटना अद्यापपर्यंत घडलेली नाही. अनेक पोलीसही या सभांमधील शिस्तबद्धतेविषयी गौरवोद्गार काढतात ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF