आपले गुरुदेव आहेत तरी कसे ?

बुद्धी विचारे मनाला, तुझे गुरुदेव आहेत तरी कसे ? ।

मन म्हणाले, कोटी सूर्यांचे तेज

असलेले, ब्रह्मांडनायक, श्रीविष्णुच माझे गुरुदेव असे ॥ १ ॥

बुद्धी म्हणे मनाला, स्वभावदोष

अन् अहं दूर करायचे तरी कसे ? ।

मन म्हणे, ‘परिस्थितीतून शिकून

आनंद घेणे’, हेच याचे गुपित असे ॥ २ ॥

बुद्धी वदे मनाला, त्रासांशी लढायचे तरी कसे ? ।

मन सांगे बुद्धीला, ‘आपल्या गुरूंचे स्मरण’,

हेच लढण्याचे ब्रह्मास्त्र असे ॥ ३ ॥

बुद्धी बोले मनाला, गुरूंंना शरण जायचे तरी कसे ? ।

मन समजावे बुद्धीला, ‘कर्तेपणा गुरुचरणी अर्पण करणे’,

हेच याचे रहस्य असे ॥ ४ ॥

बुद्धी विचारे मनाला, पूर्वग्रह दूर करायचे तरी कसे ? ।

मन सांगे बुद्धीला, ‘मनमोकळेपणाने बोलणे’,

हेच याचे उत्तर असे ॥ ५ ॥

आता मन विचारे बुद्धीला, सांग

आपले गुरुदेव आहेत तरी कसे ? ।

बुद्धी उत्तरे, ‘प्रक्रियारूपी वरदानाने स्थूल-सूक्ष्मातून काळजी घेणारे आपले गुरु ‘देव’च असे ॥ ६ ॥

– सौ. मानसी मयूर उथळे, खांदा कॉलनी केंद्र, पनवेल, जि. रायगड. (३०.११.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF