शिवजयंतीच्या पार्श्‍वभूमीवर किल्ले प्रतापगड येथील अफझलखान कबरीच्या परिसरात कलम १४४ लागू

असे व्हायला हा पाकिस्तान आहे का ? छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यावर चालून आलेले अफझलखानरूपी संकट नष्ट करून इतिहास घडवला; मात्र आज तोच इतिहास छत्रपतींच्या महाराष्ट्रात प्रदर्शित करण्यास बंदी आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने कायद्याचा बडगा उगारणारे जिल्हा प्रशासन कबरीजवळचे अनधिकृत बांधकाम पाडण्याचा न्यायालयाचा आदेश पाळेल का ?

सातारा, ८ फेब्रुवारी (वार्ता.) – हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्‍वभूमीवर सातारा जिल्हा प्रशासनाकडून अफझलखान कबरीच्या परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात दिनांक, तिथी आणि परंपरा यानुसार ३ वेळा शिवजयंती साजरी केली जाते. या वेळी किल्ले प्रतापगड येथील शिवप्रतापभूमीचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून बहुसंख्येने शिवप्रेमी येत असतात. प्रतापगडाच्या पायथ्याशीच असलेल्या अफझलखानाच्या कबरीचा प्रश्‍न सध्या न्यायप्रविष्ट असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कलम १४४ लागू  करण्यात आले आहे. ३१ जुलै २०१९ पर्यंत अफझलखान कबरीजवळील ३०० मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १४४ नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे.


Multi Language |Offline reading | PDF