भोपाळ येथील काँग्रेसच्या फलकावर राहुल गांधी ‘राम’, तर पंतप्रधान मोदी ‘रावण’ !

  • निवडणुका आल्यावर आता काँग्रेसलाही राम आठवायला लागला !
  • हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्‍या काँग्रेसच्या विरोधात गुन्हा नोंद करून संबंधितांना कारागृहात डांबायला हवे ! अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांचा असा अवमान करण्याचे धाडस कोणीही कधी दाखवत नाही, हे लक्षात घ्या !
  • ‘भाजप सरकारने देवतांचा अवमान करणारे चित्रपट, नाटक, विज्ञापने आदींवर कारवाई करण्याचा कायदा आणला असता, तर अशा घटना रोखता आल्या असत्या’, हे त्याला आतातरी समजेल का ?

(हे छायाचित्रे प्रसिद्ध करण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने ही प्रसिद्ध केली आहेत. – संपादक)

भोपाळ (मध्यप्रदेश) – येथे काँग्रेसच्या एका फलकावर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे भगवान राम, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रावणाच्या रूपात दाखवण्यात आले आहे. या फलकावर ‘राम’रूपी राहुल गांधी ‘रावण’रूपी मोदी यांच्यावर शरसंधान करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. या फलकावर ‘राफेल’ विमान दाखवण्यात आले असून ‘चौकीदार (नरेंद्र मोदी) चोर है’ असेही लिहिण्यात आले आहे. भाजपने हा फलक हटवण्याची मागणी केली आहे.


Multi Language |Offline reading | PDF