पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्यासह इतर राजकारण्यांवरील खटला मागे घेण्यात अनियमितता असल्याविषयी याचिका 

मुंबई – पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्यासह इतर राजकारण्यांचा खटला मागे घेण्यात मोठी अनियमितता झाली आहे, असा दावा करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली आहे. ही याचिका माहितीच्या अधिकाराचे कार्यकर्ते शकील अहमद यांच्या वतीने नितीन सातपुते यांनी प्रविष्ट केली. यात म्हटले आहे की, राज्य सरकार अधिकाराप्रमाणे बंद, मोर्चे आदींच्या संदर्भातील साधारण गुन्हे मागे घेऊ शकते. जून २०१७ पासून सप्टेंबर २०१८ पर्यंत २ सहस्र ३०० आरोपींचे खटले परत घेण्यात आले आहेत. एकूण ४१ खटल्यांतील आरोपींनी एकूण १ कोटी ७७ लाख ८७ सहस्र रुपयांच्या शासकीय आणि खासगी संपत्तीची हानी केली आहे. तरीही या आरोपींकडून पैसे आकारण्यात आले नाहीत.


Multi Language |Offline reading | PDF