रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेला उपस्थित असलेल्या देश-विदेशातील जिज्ञासूंचा परिचय आणि त्यांना आलेल्या अनुभूती

जगभरातील जिज्ञासूंना अध्यात्म आणि साधना यांचे स्वतःच्या जीवनातील महत्त्व कळावे, तसेच त्यांना साधनेतील प्रायोगिक भागांविषयी अवगत करावे’, या उद्देशांनी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने वेळोवेळी कार्यशाळांचे आयोजन केले जाते. या अंतर्गत २६ ते ३०.१.२०१९ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत देश-विदेशातून सहभागी झालेल्या जिज्ञासूंचा परिचय  आणि त्यांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

१. अ‍ॅनी गिल्बर्ट, बेल्जियम

अ‍ॅनी गिल्बर्ट

१ अ. परिचय

अ‍ॅनी गिल्बर्ट यांचा मुलगा व्हिन्सेंट आणि सून इसाबेला साधक आहेत. अ‍ॅनी गिल्बर्ट मुलाच्या घरी गेल्या असतांना त्यांच्या साधनेला आरंभ झाला. ‘बाहेरून मी शांत वाटत असले, तरी आतून मी तशी नाही’, असे त्यांना जाणवत होते. त्यांनी नामजप करायला आरंभ केल्यानंतर त्यांना शांत वाटू लागले.

१ आ. कार्यशाळेला येण्याचा उद्देश

मृत्यूनंतरच्या जीवनाबद्दल, तसेच ‘आपल्या जीवनावर पूर्वजांचा प्रभाव कसा असतो ?’, यांसंदर्भात असणार्‍या शंकांचे निरसन करून घेण्यासाठी त्या कार्यशाळेत आल्या आहेत. येथे येऊन साधकांच्या समवेत रहाण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांना कृतज्ञता वाटत आहे.

२. श्री. व्हेर्नॉन लॅम, अमेरिका

श्री. व्हेर्नॉन लॅम

२ अ. परिचय

श्री. व्हेर्नॉन लॅम हे गेल्या ७ वर्षांपासून एस्.एस्.आर्.एफ्.च्या संपर्कात असून यापूर्वीही ते महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेसाठी उपस्थित होते.

२ अ १. बालपणापासून ईश्‍वराप्रती ओढ असणे, कॅथॉलिक शाळेत ‘ईश्‍वर म्हणजे कोण आहे ?’, याविषयी शिकवण्यात येणे, ईश्‍वराला प्रतिदिन प्रार्थना करणे आणि ‘ईश्‍वराला भावाश्रूंसहित आळवले, तर त्याच्यापर्यंत प्रार्थना पोहोचतात’, असा भाव असणे : बालपणापासून त्यांना ईश्‍वराप्रती ओढ आहे. त्यांच्या आईने त्यांना कॅथॉलिक शाळेत घातले. तेथे त्यांना ‘ईश्‍वर म्हणजे कोण आहे ?’, तसेच ‘ईश्‍वर म्हणजे विश्‍वाचा निर्माता आहे, जो त्याने निर्माण केलेल्या सृष्टीवर प्रेम करतो’, यांविषयी शिकवण्यात आले. ते प्रतिदिन अगदी रात्री उशिरापर्यंत ईश्‍वराला प्रार्थना करत असत. ‘ईश्‍वर म्हणजे माझा सखा आहे’, असे त्यांना वाटत असे. ‘ईश्‍वराला भावाश्रूंसहित आळवले, तर त्याच्यापर्यंत प्रार्थना लगेच पोहोचतात’, असा त्यांचा भाव असे.

२ अ २. माध्यमिक शाळेत जाऊ लागल्यावर ईश्‍वराविषयी पडलेल्या अनेक प्रश्‍नांची उत्तरे शोधणे आणि ‘प्रत्येकानेच ईश्‍वराविषयी जाणून घेतले पाहिजे’, असे वाटणे : ते माध्यमिक शाळेत जाऊ लागले. तेव्हा त्यांना ईश्‍वराविषयी अनेक प्रश्‍न पडू लागले आणि त्या प्रश्‍नांची उत्तरे ते शोधू लागले. त्यांना वाटत असे, ‘ईश्‍वर सर्वज्ञ आहे. तोच सर्वांचा सांभाळ करतो आणि सर्वांचे दायित्व घेतो, तर प्रत्येकानेच त्याच्याविषयी जाणून घेतले पाहिजे. ‘त्याच्याकडे जावे (एकरूप व्हावे)’, असे प्रत्येकाला वाटले पाहिजे. सर्वांनी ईश्‍वरासाठी एवढे तरी केलेच पाहिजे.’

२ अ ३. वयाच्या १५ व्या वर्षापासून माहितीजालावर प्रश्‍नांची उत्तरे शोधण्यास आरंभ करणे आणि त्या वेळी एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळाला भेट दिल्यावर सर्व प्रश्‍नांची उत्तरे मिळणे : वयाच्या १५ व्या वर्षापासून त्यांनी माहितीजालावर प्रश्‍नांची उत्तरे शोधण्यास आरंभ केला. त्या वेळी त्यांना ‘आऊजा बोर्ड’, ‘भूते’ अशा विविध विषयांची माहिती संकेतस्थळावर मिळाली. आणखीन माहिती शोधतांनाच त्यांना एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळावर ‘वाईट शक्तीशी संबंधित माहिती मिळाली. या माहितीविषयी बर्‍याच जणांनी नकारात्मक मत व्यक्त केले होते; मात्र श्री. व्हेर्नॉन यांना ‘एस्.एस्.आर्.एफ्.ने या माहितीच्या माध्यमातून विषय शास्त्रीय परिभाषेत मांडला आहे’, असे वाटले. त्यांनी एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळाला भेट देऊन त्यावरील अन्य माहिती वाचली. तिच्यातूनच त्यांना त्यांच्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे मिळाली. एस्.एस्.आर्.एफ्.चे संकेतस्थळ म्हणजे त्यांना ‘सोन्याचा खजिनाच मिळाला आहे’, असे वाटले. ‘एस्.एस्.आर्.एफ्.मध्ये मला सत्य सापडले आहे’, हे त्यांना त्यांच्या मित्रांना सांगायचे होते; परंतु ते सांगू शकले नाहीत; कारण त्यांचे मित्र त्यांना समजू शकत नव्हते.

२ अ ४. जवळपास कुणीच साधक नसल्याने ‘ऑनलाइन’ सत्संगातच सहभागी होऊ शकणे आणि वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर वाहन चालवण्याचा परवाना मिळाल्यावर अमेरिकेत घेण्यात आलेल्या सर्व व्याख्यानांना उपस्थित रहाणे : वयाच्या १५ ते १८ वर्षांच्या कालावधीत त्यांना एकटेपणा जाणवू लागला. ते रहात असलेल्या ठिकाणी जवळपास कुणीच साधक रहात नव्हते. त्यामुळे ते केवळ ‘ऑनलाइन’ सत्संगातच सहभागी होऊ शकत होते. त्यांच्यात साधनेची तीव्र तळमळ असल्याने याही परिस्थितीत त्यांनी साधना करणे चालू ठेवले होते. ज्या वर्षी त्यांच्या वयाची १८ वर्षे पूर्ण झाली आणि त्यांना वाहन चालवण्याचा परवाना मिळाला, त्या वर्षी अमेरिकेत घेण्यात आलेल्या सर्व व्याख्यानांना ते उपस्थित राहिले. (‘त्या वेळी एस्.एस्.आर्.एफ्.च्या वतीने अमेरिकेत व्याख्याने आयोजित करण्यात आली होती.’ – संकलक) 

२ आ. श्री. व्हेर्नॉन लॅम यांनी व्यक्त केलेले मनोगत !

२ आ १. ‘कार्यशाळेत सहभागी होणे’, ही आनंददायी अनुभूती असणे आणि कुटुंबियांकडून कधी न मिळालेले प्रेम साधकांकडून मिळणे : ‘मी मागच्या वेळी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यशाळेला आलो असतांना अनेक साधकांना भेटलो. ती माझ्यासाठी आनंददायी अनुभूती होती. प्रत्येक साधकामध्ये मला जो प्रेमभाव जाणवला, तो मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. एवढे प्रेम मला माझ्या कुटुंबियांकडूनही कधी मिळाले नाही.

२ आ २. कार्यशाळेनंतर मायदेशी परतल्यानंतर साधना करणे कठीण जाऊ लागणे, पूर्णतः निराशेत जाणे, त्याच कालावधीत एस्.एस्.आर्.एफ्.च्या पू. (सौ.) भावना शिंदे अध्यात्माच्या प्रसारकार्यासाठी येणे आणि स्वतःला येणार्‍या अडचणींविषयी त्यांना पत्र लिहिणे : कार्यशाळेनंतर मायदेशी परतल्यानंतर मला तेथे साधना करणे कठीण जाऊ लागले. मला मायेतील जीवन आणि आध्यात्मिक जीवन यांत कशातच रस वाटत नव्हता. वर्ष २०१८ मध्ये एक वेळ अशी आली की, मी पूर्णतः निराशेत गेलो होतो आणि ‘मला आता काहीच जमणार नाही’, असे मला वाटत होते. त्याच कालावधीत मी रहात असलेल्या ठिकाणी एस्.एस्.आर्.एफ्.च्या संत पू. (सौ.) भावना शिंदे अध्यात्माच्या प्रसारकार्यासाठी आल्या होत्या. गेल्या २ – ३ वर्षांपासून माझ्या जीवनात येत असलेल्या अडचणींविषयी मी त्यांना एक मोठे पत्र लिहिले.

२ आ ३. मागच्या वेळी कार्यशाळेसाठी आल्यावर एका संतांनी आश्रमात येऊन साधना करण्याविषयी सांगणे आणि या वेळी पू. (सौ.) भावना शिंदे यांनीही अगदी तसेच मार्गदर्शन केल्याने कार्यशाळेच्या निमित्ताने पुन्हा रामनाथी आश्रमात येणे : मागच्या वेळी कार्यशाळेसाठी आलो असतांना माझी एका संतांशी भेट झाली होती. त्या वेळी मी त्यांना ‘घरात राहून साधना कशी करायची ?’, याविषयी विचारले असता त्यांनी मला आश्रमात येऊन साधना करण्याविषयी सांगितले होते. पू. (सौ.) भावना शिंदे यांनीही मला अगदी तसेच मार्गदर्शन केले. त्यामुळेच मी या कार्यशाळेच्या निमित्ताने पुन्हा रामनाथी आश्रमात आलो असून मी येथे साधना करण्यासाठी अधिकाधिक वेळ रहाणार आहे.

२ आ ४. प्रयत्नांची पराकाष्ठा करून ईश्‍वरप्राप्तीपर्यंत पोेहोचायचे आणि सर्व मानवजातीची दुःखे दूर होण्यासाठी त्यांना साहाय्य करण्याचे ध्येय असणे : प्रयत्नांची पराकाष्ठा करून मला ईश्‍वरप्राप्तीपर्यंत पोहोचायचे आहे. समष्टीसाठी जे काही चांगले करता येईल, ते सर्व मला करायचे आहे. सर्व मानवजातीची दुःखे दूर होण्यासाठी मला त्यांना साहाय्य करायचे आहे. ‘मी ज्या दुःखातून गेलो आहे, ती इतरांना येऊ नयेत’, यासाठी मला त्यांना साहाय्य करायचे आहे.

२ इ. रामनाथी आश्रमात आल्यावर आलेल्या अनुभूती

२ इ १. नामजप करतांना भावजागृती होणे, ‘ईश्‍वरप्राप्तीसाठी तळमळीने प्रयत्न करायला हवेत’, असे वाटणे आणि जवळजवळ एक घंटा या भावस्थितीत असणे : २५.१.२०१९ या दिवशी नामजप करतांना माझी पुष्कळ भावजागृती होत होती. ‘मला माझे सर्वस्व ईश्‍वरचरणी अर्पण करायचे आहे. तो मला इतके काही देत आहे की, केवळ ‘ते स्वीकारणे आणि स्वतःला भाग्यवान समजणे’, एवढ्यातच न रहाता मला त्याच्या प्राप्तीसाठी तळमळीने प्रयत्न करायला हवेत’, असे वाटत होते. जवळजवळ एक घंटा मी या भावस्थितीत होतो आणि तो संपूर्ण एक घंटा माझ्या डोळ्यांतून भावाश्रू वहात होते.

२ इ २. एका संतांना पाहिल्यावर भावजागृती होऊन अश्रू अनावर होणे : त्याच दिवशी सायंकाळी आश्रमातील एका कार्यक्रमाच्या वेळी (‘आश्रमात पू. भगवान डोणे महाराज यांचा श्री हालसिद्धनाथ देवाच्या प्रासादिक भाकणुकीचा कार्यक्रम होता.’ – संकलक) मी एका संतांना पाहिले. त्यांना पाहून माझी इतकी भावजागृती झाली की, मला पुन्हा अश्रू अनावर झाले. ‘मला केवळ अन् केवळ संतांशीच एकरूप व्हायचे आहे’, असे वाटत होते.

२ इ ३. संतांनी घोड्यावरून हात फिरवल्यावर ‘घोड्याच्या ठिकाणी आपणच आहोत’, असे वाटणे : संतांनी घोड्यावरून हात फिरवला. तेव्हा ‘घोड्याच्या ठिकाणी मीच आहे’, असे मला वाटत होते. संतांनी केलेले मार्गदर्शन मला मिळाले नसते, तर माझे आयुष्य एखाद्या प्राण्यासारखेच (जनावरासारखे) झाले असते.

२ इ ४. कार्यक्रमाच्या वेळी आलेल्या संतांना नमस्कार करण्याविषयी साधकांना सांगण्यात आले. त्या वेळी ‘ईश्‍वर माझ्यावर कृपेचा वर्षाव करत आहे’, असे मला वाटले.

२ इ ५. कार्यशाळेतील ‘गुरुकृपायोग’ या सत्रात ‘खरे गुरु आयुष्यात आल्यावर आपले सर्वस्व त्यांच्या चरणी अर्पण करायला हवे’, असे आपल्याला आतूनच वाटू लागते’, हे सूत्र ऐकल्यावर अंतरात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी तसा समर्पणभाव जाणवणे : २६.१.२०१९ या दिवशी कार्यशाळेतील ‘गुरुकृपायोग’ या सत्रात एक सूत्र सांगण्यात आले, ‘आपण गुरु शोधायचे नसतात, तर ते स्वतः आपल्या आयुष्यात येतात. जेव्हा आपले खरे गुरु आपल्या आयुष्यात येतात, तेव्हा ‘आपले सर्वस्व त्यांच्या चरणी अर्पण करायला हवे’, असे आपल्याला आतूनच वाटू लागते.’ हे सूत्र ऐकल्यावर मला अंतरात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी तसा समर्पणभाव जाणवत आहे.’

३. श्री. पीटर के., अ‍ॅडलेड, ऑस्ट्रेलिया.

३ अ. परिचय

श्री. पीटर के.

३ अ १. ‘पौर्णिमा’ या विषयावर माहितीजालावर माहिती शोधत असतांना एस्.एस्.आर्.एफ्.चे संकेतस्थळ सापडणे आणि संकेतस्थळावरील ‘पौर्णिमा अन् अमावास्या’ या विषयांवरील लेख भावल्याने अन्य लेख वाचणे चालू ठेवणे : साधारण साडेतीन वर्षांपूर्वी श्री. पीटर यांना एस्.एस्.आर्.एफ्.विषयी समजले. ‘पौर्णिमा’ या विषयावर ते आणि त्यांचे वडील यांच्यात चर्चा चालू असतांना माहितीजालावर त्याविषयी माहिती शोधत असतांना श्री. पीटर यांना एस्.एस्.आर्.एफ्.चे संकेतस्थळ सापडले. संकेतस्थळावरील ‘पौर्णिमा आणि अमावास्या’ या विषयावरील लेख त्यांना भावला. त्यामुळे संकेतस्थळावरील अन्य लेखही वाचणे त्यांनी चालू ठेवले.

३ अ २. त्यानंतर त्यांनी नामजप करायला आरंभ केला.

३ अ ३. संकेतस्थळावर सांगितलेले सर्व त्यांनी कृतीत आणले अन् त्याचा त्यांना लाभही झाला.

३ अ ४. मीठ-पाण्याचे उपाय केल्यावर स्वतःतील वाईट शक्ती निघून जात असल्याचे जाणवणे : त्यानंतर त्यांनी मीठ-पाण्याचे उपाय केले अन् ‘स्वतःतील वाईट शक्ती निघून जात आहे’, असे त्यांना अनुभवायला आले. यावरून ‘इतरही उपायांचा लाभ होणार’, असे त्यांना वाटू लागले.

३ अ ५. ते या कार्यशाळेसाठी दुसर्‍यांदा आले आहेत.

३ आ. रामनाथी आश्रमात आल्यावर आलेली अनुभूती

३ आ १. ध्यानमंदिरात साष्टांग नमस्कार घातल्यावर डोक्यातून पुष्कळ शक्ती आत जात असल्याचे, तसेच स्वतःमध्ये पुष्कळ विनम्रता आल्याचे जाणवणे : ‘ध्यानमंदिरात असतांना काही साधकांना मी साष्टांग नमस्कार घालतांना पाहिले. मलाही तसा नमस्कार करण्याची इच्छा झाल्यामुळे मीही साष्टांग नमस्कार घातला. त्या वेळी मला माझ्या डोक्यातून पुष्कळ शक्ती आत जात असल्याचे, तसेच माझ्यामध्ये पुष्कळ विनम्रता आल्याचे जाणवले.’

४. मेघा गांधी, कॉलोराडो, अमेरिका.

मेघा गांधी

४ अ. परिचय

४ अ १. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यशाळेला उपस्थित राहिलेल्या बहिणीकडून प्रेरणा घेऊन साधनेला आरंभ करणे : मेघा १२ वर्षांच्या असतांना त्यांचे कुटुंब भारतातून अमेरिकेला गेले. त्यानंतर त्यांच्या साधनेत खंड पडला. अलीकडेच त्यांची बहीण एस्.एस्.आर्.एफ्.च्या संपर्कात आली. ती महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यशाळेलाही उपस्थित राहिली. बहिणीकडून प्रेरणा घेऊन मेघा यांनी साधनेला आरंभ केला.

४ अ २. साधना चालू केल्यानंतर झालेले पालट नोकरीच्या ठिकाणी असणार्‍या सहकार्‍यांच्या लक्षात येणे आणि त्याविषयी विचारल्यावर त्यांना ‘साधना आणि स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया’ यांविषयी सांगणे : साधना चालू केल्यानंतर त्यांच्यात झालेले पालट नोकरीच्या ठिकाणी असणार्‍या त्यांच्या सहकार्‍यांच्या लक्षात आले. ‘आता तुम्ही अधिक समाधानी आहात’, असे सांगून त्यांनी मेघा यांना त्याचे कारण विचारले. त्यावर मेघा यांनी त्यांना ‘साधना आणि स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया’ यांबद्दल सांगितले.

४ अ ३. नवीन नोकरीच्या ठिकाणी स्वभावदोष उफाळून येत असल्याने स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेवर भर द्यायचे ठरवणे : त्यांच्या नवीन नोकरीच्या ठिकाणी त्यांचे स्वभावदोष उफाळून येत असून त्यांना त्यावर नियंत्रण मिळवता येत नाही. त्यामुळे त्यांना स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेवर भर द्यायचा आहे.

४ आ. कार्यशाळेला येण्याचा उद्देश : ‘आध्यात्मिक उपायांवर लक्ष केंद्रित करणे, साधनेत सातत्य आणणे आणि दैनंदिन जीवनातही देवाला अनुभवता येणे ’, यांसाठी त्या कार्यशाळेत आल्या आहेत.

५. रेखा खरे, भारत

रेखा खरे

५ अ. परिचय

रेखा खरे काही वर्षांपासून श्री गजानन महाराज यांची भक्ती करत आहेत. त्यांनी ११ दिवसांचा ‘विपस्यना कोर्स’ केला आहे. एस्.एस्.आर्.एफ्.च्या मार्गदर्शनानुसार साधना करणारा त्यांचा मुलगा आणि सून यांच्यामुळे त्यांना साधना करण्याची प्रेरणा मिळाली आहे. आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी योग्य साधना करण्याची त्यांची इच्छा आहे.


Multi Language |Offline reading | PDF