मणीपूर येथील संघटनांकडून ‘यू ट्युब’वर फुटीरतावादी वृत्तींना खतपाणी घालणारा व्हिडिओ प्रसारित

देशातील फुटीरतावाद्यांवर कठोर कारवाई होत नसल्याने त्यांच्या कारवाया वाढत चालल्या आहेत, हे केंद्रातील भाजप सरकारला लक्षात का येत नाही ?

हरिद्वार – नागरिकत्व कायदा (सीएबी), राष्ट्रीय सुरक्षा कायदा (एन्एस्ए), सशस्त्र सेना विशेष अधिकार अधिनियम (एएफ्एस्पीए), तसेच भाजप आणि हिंदुत्व यांच्या विरोधात होणारी आंदोलने आणि निषेध व्यक्त करणार्‍या मोर्च्यांचा संदर्भ घेऊन ‘इंफाल टॉकीज’ आणि ‘द हॉलर्स’ या संघटनांनी ‘यू ट्युब’वर अडीच मिनिटांचा कृष्णधवल व्हिडिओ अपलोड केला आहे. त्यात ‘हिंदुत्वाला येथे जागा नाही’ आणि ‘हॅलो चीन, बाय बाय इंडिया’ या घोषणा आंदोलक देत असल्याचे दाखवण्यात आले आहे. ‘हा व्हिडिओ ख्रिस्ती मिशनर्‍यांचा खोडसाळपणा असावा आणि तो ‘यू ट्युब’वरून त्वरित काढून टाकावा’, अशी मागणी राष्ट्रभक्तांनी केली आहे. (अशी मागणी का करावी लागते ? सरकार स्वतःहून तो काढून टाकून तो अपलोड करणार्‍यांच्या विरोधात कारवाई का करत नाही ? – संपादक)

४ फेब्रुवारी २०१९ या दिवशी अपलोड केलेल्या या व्हिडिओत भारतीय राज्यघटनेनुसार संमत केलेले अनेक कायदे आणि प्रस्ताव यांचा निषेध करण्यासाठी भारतीय शासनाने सर्व मर्यादा ओलांडल्या असल्याचे दाखवण्यात आले आहे, तसेच त्यांना आव्हान दिले आहे. यात भारतीय यंत्रणेला ‘जोकर्स’ आणि ‘कठपुतळे’ अशी उपमा देत त्यांची टिंगल करण्यात आली आहे. आंदोलकांनी ‘ते रहात असलेली भूमी हे त्यांच्या पूर्वजांचे ‘राज्य’ होते. ते भारतीय राष्ट्रापेक्षाही प्राचीन होते’, असा दावा केला आहे. (मणीपूर आणि प्रागज्योतिषपूर (आताचे आसाममधील गुवाहाटी शहर वर्मन साम्राज्याच्या अधीन असलेल्या कामरूप राज्याची राजधानी होती) यांचा महाभारतात उल्लेख केला गेला आहे, हेही या देशद्रोह्यांना माहीत नाही. प्राचीन काळी आर्यावर्त म्हणून ओळखल्या जाणार्‍या भारताचा वैदिक धर्म होता आणि तोच आता हिंदु धर्म म्हणून ओळखला जात आहे. तरीही काही फुटीरतावादी स्वतःला अधिक शहाणे समजत या इतिहासाला नाकारत आहेत. – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF