(म्हणे) ‘कोणाचेही सरकार आले, तरी राममंदिर होईल !’ – सरसंघचालक मोहन भागवत

राममंदिर बांधण्याची धमक संघासहित कुठल्याही मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनेमध्ये नाही, हेच वारंवार सिद्ध झाल्याने हिंदू आता भाजप, विहिंप आणि संघ यांच्या भूलथापांना बळी पडणार नाहीत, हे त्यांनी लक्षात ठेवावे !

डेहराडून (उत्तराखंड) – लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात कोणीही सत्तेवर आले, तरी धर्मगुरूंना समवेत घेऊनच राममंदिर उभारण्याचे काम चालू केले जाईल, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. येथे आयोजित संघाच्या एका कार्यक्रमात त्यांनी असे घोषित केल्याची माहिती संघाच्या एका नेत्याने दिली. ‘कुंभमेळ्यातील धर्मसंसदेनुसारच मंदिराची उभारणी होईल’, असेही भागवत यांनी स्पष्ट केले. या वेळी सरसंघचालकांनी राममंदिर, धार्मिक भेदभाव आणि जातीनिहाय आरक्षण अशा विषयांवर विचार व्यक्त केले. ‘लोकसभा निवडणुकीसाठी राममंदिराचे आंदोलन आम्ही थांबवत आहोत’, अशी भूमिका विश्‍व हिंदु परिषदेने घेतली.

१. संघाच्या नेत्याने पुढे सांगितले की, सरसंघचालकांनी राममंदिराच्या उभारणीचा दिनांक सांगितलेला नाही. (राममंदिर बांधणारच नाहीत, तर दिनांक कसे सांगतील ? – संपादक) राममंदिर आणि गोरक्षा हे हिंदु संस्कृतीचे आधार आहेत, असे ते म्हणाले. (हे हिंदूंना ठाऊक नाही का ? यासाठी संघाने त्याच्याच विचारसरणीच्या राजकीय पक्षाची सत्ता असतांना ठोस प्रयत्न का केले नाहीत, हे सरसंघचालकांनी सांगायला हवे ! – संपादक)

२. संघाचे प्रसिद्धी प्रमुख अरुण कुमार म्हणाले की, संघाचा राममंदिर उभारण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याचा कार्यक्रम चालूच राहील. (केंद्रात गेले पावणे पाच वर्षे भाजप सत्तेत असतांना राममंदिर न उभारणारा संघ म्हणे राममंदिरासाठी जनजागृतीचे कार्यक्रम घेणार ! – संपादक)

मदरशांमधून राष्ट्रीयत्वाचे धडे शिकवले पाहिजेत ! – सरसंघचालक

भाजप सरकारकडून मदरशांना कोट्यवधी रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. त्या वेळीच मदरशांतून राष्ट्रीयत्वाचे धडे देणे भाजपने बंधनकारक का केले नाही, हे भागवत यांनी सांगायला हवे !

डेहराडून – मदरशांमधून राष्ट्रीयत्वाचे धडे दिले पाहिजेत; कारण राष्ट्रीयत्वामध्ये कोणताही धार्मिक भेदभाव नाही; उलट शांततेच्याच गोष्टी केल्या जातात, असे विधान सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे निवृत्त अधिकार्‍यांच्या कार्यक्रमात केले. ‘मुसलमान त्यांची उपासनापद्धत अवलंबण्यास स्वतंत्र आहेत; मात्र त्यांनी हे लक्षात घ्यायला हवे की, आपण एकाच देशाचे नागरिक असून आपली संस्कृती एक आहे. आपले पूर्वज एक आहेत. हा सामूहिक विचारच सशक्त समाज आणि देश निर्माण करण्याचा मार्ग प्रशस्त करतो’, असेही ते पुढे म्हणाले. (सरसंघचालक अथवा संघवाले हे वारंवार सांगत असतात; मात्र धर्मांध ते मानायला सिद्ध नाहीत. त्यांच्याकडून अशी अपेक्षा करणे, हे पालथ्या घड्यावर पाणी ओतण्यासारखे आहे ! सरसंघचालकांनी ‘धर्मांध सुधारतील’, अशी अपेक्षा करण्याऐवजी त्यांना सामोरे जाण्यासाठी प्रभावी हिंदूसंघटन करणे अपेक्षित आहे ! – संपादक)

सरसंघचालक या संदर्भात उदाहरण देतांना पुढे म्हणाले की, भारतीय, तसेच अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील लोकांचे पूर्वज एकच आहेत. ते एकाच संस्कृतीचे आहेत. इस्लाममध्ये संगीत वर्ज्य आहे; मात्र या देशांमध्ये कव्वाली गायली जाते. यातून हे दिसते की, आम्ही सर्व संस्कृतीद्वारे हिंदूच आहोत. (असे गोल गोल बोलण्यापेक्षा सरसंघचालक थेट का सांगत नाहीत की, भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान येथील आताचे मुसलमान बाटवले गेलेलेे हिंदू आहेत आणि त्यांनी परत हिंदु धर्मात येण्यासाठी प्रयत्न करायला हवा ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF