गोशाळांसाठी २४८ कोटी, तर अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी ९४२ कोटी रुपये

उत्तरप्रदेश सरकारचा अर्थसंकल्प

  • हिंदूंना दिले म्हणजे मुसलमानांना दिलेच पाहिजे, अशा काँग्रेसी मनोवृत्तीने उत्तरप्रदेशातील भाजप सरकार वागत आहे, हेच यातून लक्षात येते !
  • अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देणारे भाजप सरकार हिंदु विद्यार्थ्यांच्या उत्कर्षासाठी किती निधी देते ?

लक्ष्मणपुरी – उत्तरप्रदेश सरकारने ७ फेब्रुुवारीला अर्थसंकल्प सादर केला. त्यात सरकारने राज्यातील गोशाळांची उभारणी आणि देखभाल यांसाठी २४८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्याच वेळी अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी ९४२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तसेच मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी ४५९ कोटी रुपये देण्यात आले आहेत. (मदरशांमधून राष्ट्रघातकी शिक्षण दिले जात असल्याचे वारंवार पुढे येऊनही त्यांना टाळे ठोकण्याऐवजी त्यांना कोट्यवधी रुपयांचा निधी देणारे सरकार राष्ट्रघातकीच होय ! – संपादक)

अर्थसंकल्पातील काही तरतुदी

  •  अयोध्येतील पर्यटनस्थळांसाठी १०१ कोटी रुपये
  •  काशी विश्‍वनाथ महामार्गासाठी २०७ कोटी रुपये
  •  वृंदावन शोध संस्थानसाठी १ कोटी रुपये
  •  काशी हिंदु विश्‍वविद्यालयातील वैदिक विज्ञान केंद्रासाठी १६ कोटी रुपये


Multi Language |Offline reading | PDF