सत्ता आल्यास तोंडी तलाकविरोधी कायदा रहित करणार ! – काँग्रेस

महिलांवरील अत्याचारांपेक्षा मुसलमानांच्या मतांसाठी प्रयत्न करणार्‍या काँग्रेसचे खरे स्वरूप आतातरी महिलांना समजेल का ?

 

काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाच्या नेत्या सुश्मिता देव

नवी देहली – काँग्रेसची सत्ता आली, तर तोंडी तलाकविरोधी कायदा रहित करण्यात येईल, असे आश्‍वासन काँग्रेसने दिले आहे. येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने एक परिषद आयोजित करण्यात आली. त्यात काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाच्या नेत्या सुश्मिता देव यांनी वरील आश्‍वासन दिले. या वेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीही उपस्थित होते.


Multi Language |Offline reading | PDF