शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशाला केरळ सरकारच्या दबावामुळे समर्थन दिलेले नाही !

त्रावणकोर देवस्वम बोर्डाचा खुलासा

मंदिरांचे सरकारीकरण झाल्यावर सरकार सांगणार, तेच सरकारी अधिकारी करणार, हे वेगळे सांगायला नको ! केरळमध्ये माकपचे सरकार असल्यावर हिंदुविरोधीच निर्णय घेतले जाणार, यात नवीन ते काय ! अशा घटना रोखण्यासाठी मंदिरे हिंदूंच्या कह्यात असणारे हिंदु राष्ट्रच हवे !

नवी देहली – शबरीमला मंदिरात सर्व वयोगटांमधील महिलांना प्रवेश देण्यास आमचा पाठिंबा आहे, असा पवित्रा या मंदिराचे व्यवस्थापन पहाणार्‍या त्रावणकोर देवासम बोर्डाने ६ फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात झालेल्या पुनर्विचार याचिकेवरील सुनावणीच्या वेळी घेतला. या याचिकेवरील निर्णय न्यायालयाने राखून ठेवलेला आहे. बोर्डाचे अध्यक्ष ए. पद्मकुमार म्हणाले की, आम्ही केरळ सरकारच्या दबावामुळे हा निर्णय घेतलेला नाही. आम्ही २८ सप्टेंबर २०१८ चा निर्णय मान्य केला होता. तसेच आम्ही पुनर्विचार याचिकाही केलेली नाही. आम्ही केवळ न्यायालयाच्या आदेशाची कार्यवाही करण्यासाठी वेळ मागितला होता.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now