‘राज्यघटनेत ‘वन्दे मातरम्’ म्हणणे अनिवार्य नाही’, असे सांगत प्रजासत्ताकदिनी ते न म्हणणार्‍या धर्मांध शिक्षकाला नागरिकांनी चोपले !

  • केवळ राज्यघटनेत नाही; म्हणून वन्दे मातरम् म्हणण्यास नकार देतांना ‘राज्यघटनेतील किती गोष्टी धर्मांध मानतात’, हे त्यांनी सांगायला हवे !
  • राज्यघटनेचा वापर सोयीनुसार करणार्‍या अशांना कारागृहात डांबले पाहिजे !

नवी देहली – बिहारच्या कटिहार जिल्ह्यात प्रजासत्ताकदिनी एका प्राथमिक शाळेत ध्वजारोहणाच्या वेळी ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत गाण्यास विद्यालयाचा शिक्षक अफझल हुसेन यांनी नकार दिला. याची ध्वनीचित्रफीत सामाजिक माध्यमांमध्ये प्रसारित झाल्यावर ही घटना समोर आली. यानंतर स्थानिक नागरिकांनी हुसेन यांना बेदम चोपले.

१. अफझल हुसेन म्हणाले, ‘‘मी ‘वन्दे मातरम्’ म्हटले नाही; कारण ते आमच्या धर्माच्या विरोधात आहे. (‘हज यात्रा स्वतःच्या पैशांतून करायची असते’, असे इस्लामने सांगितलेे असतांना अनेक दशके सरकारी अनुदानातून ती करण्यात येत होती. तेव्हा हुसेन यांच्यासारख्यांना ‘ते धर्माच्या विरोधात आहे’, हे का आठवले नाही ? सोयीनुसार धर्मातील गोष्टींचा वापर करणारे धर्मांधच होत ! – संपादक) आम्ही अल्लाची प्रार्थना करतो आणि ‘वन्दे मातरम्’ म्हणणे म्हणजे भारताची वंदना, जी आमच्या धर्माच्या विरोधात आहे. राज्यघटनेतही हे गाणे अनिवार्य नाही.’ (ज्या भूमीवर रहाता, ज्या भूमीतून पिकणारे धान्य खाता, पाणी पिता तिला वंदन करणे जर धर्माच्या विरोधात असेल, तर अशांनी या भूमीत राहू नये आणि आखाती देशांतील वाळवंटात निघून जावे ! – संपादक)

२. कटिहार जिल्हा शिक्षणाधिकारी दिनेशचंद्र देव यांनी सांगितले की, या संदर्भात माझ्याकडे आतापर्यंत कोणतीही तक्रार आलेली नाही. जर मला अशी कोणतीही सूचना मिळाली, तर त्याची चौकशी केली जाईल. (सामाजिक माध्यमातून सर्वत्र प्रसारित होणारा ‘व्हिडिओ’ समोर येऊनही आणि स्थानिकांनी प्राथमिक शाळेच्या शिक्षकाला चोपले असल्याचे समोर येऊनही शिक्षणाधिकारी असे म्हणत असतील, तर प्रथम त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF