(म्हणे) ‘विद्यापीठ परिसर धर्मनिरपेक्ष असल्याने सरस्वतीदेवीची पूजा करता येणार नाही !’ – कोची विद्यापीठ

  • बहुसंख्य हिंदूंच्या देशात विद्येची देवता सरस्वतीदेवीची पूजा विद्यापिठात करता येत नाही, हे हिंदूंना लज्जास्पद ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदूंनी हिंदु राष्ट्राची स्थापना करावी !
  • देशात कुठेही दिवसातून ५ वेळा नमाजपठण केले जाते; मात्र त्या वेळी कोणाला धर्मनिरपेक्षतेची आठवण होत नाही, हे लक्षात घ्या !
  • साम्यवादी सरकार असलेल्या केरळ राज्यातील विद्यापिठाकडून वेगळी काय अपेक्षा केली जाणार ?

थिरूवनंतरपूरम् (केरळ) – विद्यापीठ परिसर हा धर्मनिरपेक्ष असून विद्यापिठाच्या आवारात कुठल्याही धार्मिक कार्यक्रमाला बंदी आहे, असे उत्तर कट्टनाड येथील कोची विद्यापिठाच्या प्राचार्यांनी दिले. येथे सरस्वतीदेवीची महापूजा करण्याची मागणी करणार्‍या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातील उत्तर भारतीय विद्यार्थ्यांना पत्राद्वारे हे उत्तर देण्यात आले आहे.

(वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा.)

त्यामुळे येथे नियोजनानुसार ८ फेब्रुवारीला या विद्यार्थ्यांना सरस्वतीपूजा करता येणार नाही. गेल्या वर्षी या विभागाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात ही पूजा करण्यात आली होती. या वर्षी या विद्यार्थ्यांनी ९ आणि ११ जानेवारीला महापूजेसाठी अनुमती मागितली होती. (विद्यार्थ्यांच्या पत्राला विलंबाने उत्तर देणारे प्राचार्य विद्यार्थ्यांसमोर कसला आदर्श ठेवणार ? धर्मनिरपेक्ष शिक्षणप्रणालीमुळे भारताला असले प्राचार्य लाभले आहेत ! – संपादक) 


Multi Language |Offline reading | PDF