हज यात्रेसाठीचे अनुदान रहित करून ४५० कोटी रुपयांची बचत करणार

भिकेला लागलेल्या पाक सरकारचा निर्णय

इस्लामाबाद – पाकिस्तान हज यात्रेकरूंना देत असलेले अनुदान रहित करणार आहे. यामुळे सरकारची ४५० कोटी रुपयांची बचत होणार आहे. पाक सरकारमधील मंत्री नूरुल हक कादरी यांनी ही माहिती दिली. (भारतात न्यायालयाच्या आदेशानंतर हज यात्रेचे अनुदान रहित करण्यात आले; मात्र हे पैसे भाजप सरकारने मुसलमानांच्या अन्य योजनांसाठी वळवून आपणही काँग्रेसच्या २ पावले पुढे आहोत, हे दाखवून दिले होते ! – संपादक) हज यात्रेसाठी प्रत्येक यात्रेकरूला सरकार ४२ सहस्र रुपयांचे अनुदान देत होते. सध्याची पाकची हालाखीची आर्थिक स्थिती पहाता हे अनुदान रहित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.


Multi Language |Offline reading | PDF