चेन्नई येथे पोंगल उत्सवाच्या निमित्ताने अरुणाचलपूरम् कल्याण संघटनेच्या वतीने रांगोळी स्पर्धा

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्तीकडून सनातनच्या रांगोळी ग्रंथाप्रमाणे शास्त्राच्या आधारे परीक्षण

चेन्नई – येथे पोंगल उत्सवाच्या निमित्ताने अरुणाचलपूरम् कल्याण संघटनेच्या वतीने रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. हिंदु जनजागृती समितीच्या सौ. कल्पना बालाजी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. सनातनच्या रांगोळी ग्रंथामध्ये दिलेल्या रांगोळी शास्त्राच्या आधारावर स्पर्धेचे परीक्षण करण्यात आले. ३० रांगोळ्यांमधून ५ उत्कृष्ट रांगोळ्या निवडण्यात आल्या.

पारितोषिक वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून तमिळनाडू राज्याचे पोलीस महानिरीक्षक तिरुपेरुंदुराई मुरुगन उपस्थित होते, तसेच सौ. कल्पना बालाजी आणि श्री. के. बालाजी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. सौ. कल्पना बालाजी यांनी नामजप आणि सात्त्विक रांगोळ्या यांचे महत्त्व सांगितले. स्पर्धकांना रांगोळी ग्रंथ भेट दिले. या वेळी सनातनचे ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. काही जिज्ञासूंनी सनातन संस्थेविषयी माहिती जाणून घेतली.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now