व्हॅटिकनमधील पाद्य्रांनी नन्सचे लैंगिक शोषण केले ! – पोप फ्रान्सिस यांची स्वीकृती

  • पोप फ्रान्सिस इतकी मोठी स्वीकृती देत आहेत; मात्र भारतातील प्रसारमाध्यमे आंधळी आणि बहिरी असल्याप्रमाणे वागत आहेत, हे लक्षात घ्या !
  • पोप यांनी केवळ स्वीकृती देऊन थांबण्यापेक्षा अशांची नावे जगासमोर उघड करून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करायला हवा !
  • भारतात एका ननचे बिशपने लैंगिक शोषण केल्यानंतर कॅथलिक चर्चच्या संघटनेने या ननवरच कारवाई केली आहे, हे लक्षात घ्या !

नवी देहली – व्हॅटिकनमधील काही पाद्री आणि बिशप यांच्याकडून नन्सचे लैंगिक शोषण करण्यात आले आहे, अशी स्वीकृती ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी दिली आहे. पोप फ्रान्सिस नुकताच संयुक्त अरब अमिरातीमधील त्यांचा दौरा आटोपून व्हॅटिकन सिटीकडे रवाना झाले. त्या वेळी विमानात पत्रकारांच्या प्रश्‍नांना उत्तर देतांना त्यांनी ही स्वीकृती दिली.

१. व्हॅटिकन सिटीमधील पाद्य्रांकडून नन्सचे लैंगिक शोषण झाल्याचे वृत्त नुकतेच एका नियतकालिकातून प्रसिद्ध झाले होते. या नन्सचे गर्भपातही करण्यात आले. तसेच काही नन्स या संबंधांतून जन्माला आलेल्या मुलांचे पालनपोषण करत आहेत, असेही यात म्हटले होते.

२. पोप फ्रान्सिस यांनी यापूर्वी अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया येथील चर्चमधून लहान मुलांच्या झालेल्या लैंगिक शोषणानंतर ‘कॅथलिक चर्च याकडे गंभीरतेने आणि तत्परतेने पाहील’, असे सांगितले होते.


Multi Language |Offline reading | PDF