(म्हणे) ‘लोकसभा निवडणुकीच्या वेळी वादविवाद नको; म्हणून राममंदिराचे आंदोलन ४ मास स्थगित !’ – विहिंपकडून अधिकृत घोषणा

  • विहिंपला ‘लोकसभा निवडणूक आहे’, याची आताच कशी आठवण झाली ?
  • गेल्या ३ दशकांत विहिंप, भाजप आणि संघ यांनी काँग्रेसच्या सत्ताकाळात राममंदिराच्या सूत्रावरून आंदोलन केले होते. निवडणुकीच्या वेळी प्रसाराचे हे प्रमुख सूत्र असायचे. तेव्हा ‘वादविवाद होणार’, असे विहिंपला वाटले नव्हते का ?
  • आता राममंदिर उभारण्यावरून निवडणुकीच्या वेळी भाजपला अडचण येऊ नये; म्हणून विहिंपने हा निर्णय घेतला आहे, हे न समजायला हिंदू दूधखुळे नाहीत !

नवी देहली – देशात लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. अशात राममंदिराच्या सूत्राचे राजकारण होऊ नये; म्हणून ४ मास राममंदिर उभारण्यासाठीचे आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे विश्‍व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय संयुक्त महासचिव सुरेंद्र जैन यांनी सांगितले.

जैन पुढे म्हणाले की, राममंदिराचा विषय आमच्या आस्था आणि पावित्र्य यांच्याशी जोडलेला आहे. (नेहमीच्या पठडीतले वाक्य लोकांना सुनावणारे विहिंपवाले ! प्रत्यक्षात विहिंपला याच्याशी काहीही देणेघेणे नाही, हेच आता लक्षात येते ! – संपादक) लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी आचारसंहिता लागू होते. अशा वेळी आंदोलन चालू राहिल्यास वादविवाद होतात. त्यामुळे लोकशाहीच्या महत्त्वाच्या पर्वाचा मान राखण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे.


Multi Language |Offline reading | PDF