राष्ट्रीय महामार्गांलगतच्या मद्यविक्रीवरील निर्बंध शिथिल केल्याने देशातील मद्यविक्रीने उच्चांक गाठला

  • महसुलासाठी जनतेला मद्यपी बनवणारे आतापर्यंतचे शासनकर्ते जनताद्रोहीच !
  • धर्माचरणाने संयमी बनलेली जनता व्यसनमुक्त असते. अशी जनता निर्माण होण्यासाठी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र हवे !

मुंबई – राष्ट्रीय महामार्गांलगत असलेल्या दुकानांमधून मद्यविक्रीवरील निर्बंध शिथिल झाल्याने आणि काही राज्यांतील वितरण रचना पालटल्याने मद्यविक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे देशातील मद्यविक्रीने उच्चांक गाठला आहे. यामुळे मद्य उत्पादन करणारी आस्थापने आता नफा मिळवत आहेत, अशी माहिती उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे. वर्ष २०१७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांलगत मद्यविक्रीवर कडक निर्बंध घातले होते. यामुळे देशातील सुमारे ३० सहस्र दुकाने बंद पडली होती. वर्ष २०१८ पूर्वी सलग २ वर्षे दारूची विक्री घटली होती. आता न्यायालयाने नियम शिथिल केल्याने मद्यविक्रीची सहस्रो दुकाने पुन्हा चालू झाली आहेत. पूर्वी ५ सहस्र लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीला मद्यविक्रीच्या दुकानाची अनुमती होती, आता ती अट ३ सहस्रांपर्यंत शिथिल करण्यात आली आहे.


Multi Language |Offline reading | PDF