केरळ सरकारच्या आदेशाने भगवान अय्यप्पांच्या भक्तांवर अत्याचार

साम्यवाद्यांचा हिंदुद्वेष !

भगवान अय्यप्पा

थिरूवनंतपूरम् – केरळमधील शबरीमला मंदिरातील चालीरितींचे शांततापूर्ण मार्गाने रक्षण करणार्‍या भगवान अय्यप्पांच्या भक्तांना मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार पोलिसांनी अटक केली आहे. केरळच्या त्रिचूर जिल्ह्यातील एक धर्माभिमानी त्यांच्या ३ मित्रांसह कारागृहातील भक्तांना भेटण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले होते. तेथील पोलीस निरीक्षकांनी त्यांचे म्हणणे ऐकून न घेता त्यांनाही अटक करून कारागृहात टाकले. (केरळ पोलिसांची दडपशाही ! – संपादक)

१. शबरीमला प्रकरणी एका निश्‍चित संख्येपर्यंत भक्तांना अटक करण्याचे आदेशच पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे तेवढा आकडा आम्हाला पूर्ण करावाच लागतो, असे पोलिसांनी सांगितले.

२. हे अत्याचार एवढ्यावरच थांबले नसून पोलीस या भक्तांच्या विरोधात सरकारी मालमत्तेची हानी करणे, महिला पोलिसांवर आक्रमण करणे यांसारख्या आरोपांखाली अजामीनपात्र गुन्हे नोंदवत आहेत.

३. पोलीस भगवान अय्यप्पांच्या भक्तांना कारागृहामध्ये वाईट वागणूक देत आहेत. काही भक्तांना मारहाण केली जात आहे. कुठलीच प्रसारमाध्यमे निष्पाप भक्तांचे दु:ख आणि वेदना लोकांसमोर आणत नाहीत, असे केरळच्या एका धर्माभिमान्याने सांगितले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now